ETV Bharat / business

बँकांच्या निष्काळजीपणाने मोठ्या फसवणुकीचे प्रकार घडतात - आरबीआय डेप्युटी गव्हर्नर - Reserve Bank

आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एम.के जैन म्हणाले, बँकांकडून नियमांचे पालन न करताना त्याच चुका करत आहेत. त्याच चुका बँकांनी करू नये, अशा आरबीआयने सूचना देऊनही असे प्रकार सतत घडत आहेत.

संग्रहित
author img

By

Published : Aug 21, 2019, 2:46 PM IST

मुंबई - आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एम. के जैन यांनी नियमांची पुरेशी अंमलबजावणी होत नसल्याने बँकांवर मंगळवारी टीका केली. बँकांच्या निष्काळजीपणामुळे फसवणुकीचे मोठे प्रकार होतात. तसेच मोठा दंडही बँकांना बसत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आरबीआयने जानेवारी ते जुलैदरम्यान बँकांना एकूण १२२.९ कोटींचा दंड ठोठावला आहे.

आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एम.के जैन म्हणाले, बँकांकडून नियमांचे पालन न करताच त्याच चुका होत आहे. त्याच चुका बँकांनी करू नये, अशा आरबीआयने सूचना देऊनही असे प्रकार सतत घडत आहेत.

आरबीआयने अनेक बँकांच्या तपासण्या केल्या आहेत. यावेळी बँकांकडून होणाऱ्या नियमांचे पालन होताना त्रुटी असल्याचे आढळून आले आहे. काही बँकांमध्ये अनियमितता आढळून आली आहे. नियमांचे पालन करताना बँकांनी गांभीर्याने प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले. नियमांचे पालन करणे ही सामूहिक जबाबदारी आहे. ते केवळ वरिष्ठ व्यवस्थापनापुरते मर्यादित नाही.

केवायसी (नो यूवर कस्टमर) माहित असण्यासाठी आणि मनी लाँड्रिगवर प्रतिबंध करण्यासाठी कडक नियम लागू केल्याचे जैन यांनी सांगितले. काही महिन्यापूर्वी आरबीआयने येस बँकेचे प्रवर्तक राणा कपूर यांचा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यकाळ कमी केला होता. येस बँकेच्या प्रशासनातील त्रुटी, कर्ज मंजुरीतील कमतरता आणि इतर नियमांचे पालन केले नसल्याने आरबीआयने ही कारवाई केली होती.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.