मुंबई - पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने माजी संचालकासह दोन व्हॅल्युअलरला अटक केली आहे. या तिन्ही आरोपींचा बँकेच्या ४ हजार ३५५ कोटींच्या घोटाळा प्रकरणात सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे.
पीएमसी बँकेचे माजी संचालक जसविंदर एस. बनवैत आणि व्हॅल्युअर्स विश्वनाथ एस. प्रभू (यार्डी प्रभू कन्सल्टंट्स) आणि श्रीपाद जी. जेरे (व्हॅल्युअर्स प्रा.) अशी आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा-मंदीची भीती; मुंबई शेअर बाजारात २००८ नंतर सर्वात मोठी घसरण
बनवैत हे पीएमसी बँकेच्या कर्ज, गुंतणूक आणि कार्यकारी समितीचे सदस्य होते. त्यांनी एचडीआयएल ग्रुपला कर्ज दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशी केली आहे. तिन्ही आरोपींना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.