ETV Bharat / business

पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुंदर पिचाईंशी चर्चा, म्हणाले... - google for India initiative

गुगलकडून शिक्षण, डिजीटल शिक्षण आणि डिजीटल देयकाच्या क्षेत्रात करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले

संपादित
संपादित
author img

By

Published : Jul 13, 2020, 3:21 PM IST

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याशी आज विविध विषयावर चर्चा केली. यामध्ये कोरोनाच्या काळातील कार्यसंस्कृती, डाटा सुरक्षा आणि सायबर सुरक्षा अशा विविध विषयांचा समावेश आहे. ही चर्चा फलदायी झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

गुगलकडून शिक्षण, डिजीटल शिक्षण आणि डिजीटल देयकाच्या क्षेत्रात करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले. ते म्हणाले, की सुंदर पिचाई यांच्याबरोबर आज सकाळी फलदायी चर्चा झाली. आम्ही विविध व्यापक विषयावर चर्चा केली. यामध्ये तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याने तरुण, आंत्रेप्रेन्युअर आणि शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणे, यावर विशेषत: चर्चा करण्यात आली.

जागतिक महामारीने खेळासारख्या क्षेत्रात निर्माण झालेल्या आव्हानांवरही चर्चा करण्यात आली. कोरोनाच्या काळात बदलणाऱ्या नव्या कार्यसंस्कृतीबाबत सुंदर पिचाई आणि चर्चा केल्याचेही पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. गुगलकडून विविध क्षेत्रात करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती कळाल्यानंतर आनंद झाल्याचे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले.

पंतप्रधानांनी सुंदर पिचाईंशी झालेल्या ऑनलाईन चर्चेची फोटोही ट्विट्वर पोस्ट केला आहे. दरम्यान, सुंदर पिचाई हे अल्फाबेट आणि गुगल या कंपनीचे सीईओ आहेत. गुगल फॉर इंडियाच्या सहाव्या वार्षिक कार्यक्रमात सुंदर पिचाई हे उद्योगांसाठी गुंतवणूक करणार असल्याची घोषणा करणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.