ETV Bharat / business

पेट्रोलचे दर प्रति लिटर 22 पैसे तर डिझेलचे दर 22 पैशांनी स्वस्त

पेट्रोलचे दर प्रति लिटर 22 पैसे तर डिझेलचे दर प्रति लिटर 23 पैशांनी कमी झाल्याची माहिती सरकारी तेल कंपन्यांनी दिली आहे. या दर कपातीनंतर दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 90.56 रुपये आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 80.87 रुपये आहे.

पेट्रोलचे दर प्रति लिटर 22 पैसे
Petrol price cut by 22 paise
author img

By

Published : Mar 30, 2021, 3:46 PM IST

नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग तिसऱ्यांदा आठवडाभरात मंगळवारी कपात झाली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरत असल्याने इंधनाच्या दरात कपात झाली आहे.

पेट्रोलचे दर प्रति लिटर 22 पैसे तर डिझेलचे दर प्रति लिटर 23 पैशांनी कमी झाल्याची माहिती सरकारी तेल कंपन्यांनी दिली आहे. या दर कपातीनंतर दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 90.56 रुपये आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 80.87 रुपये आहे. विविध राज्यांमध्ये व्हॅटचे प्रमाण भिन्न आहे. त्याप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलचे दर विविध राज्यांमध्ये भिन्न आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 97.19 रुपयांवरून 96.98 रुपये आहे. तर मुंबईत डिझेलचा दर प्रति लिटर 88.20 रुपयावरून 87.96 रुपये झाला आहे.

हेही वाचा-वेगवान ड्राईव्हयू अॅप; व्हॉट्सअपॅद्वारे ड्रायव्हरची करता येणार बुकिंग

पेट्रोल व डिझेलच्या दरात चढ-उतार सुरू-

  • गेल्या सहा महिन्यांमध्ये प्रथम 24 मार्चला इंधनाच्या दरात कपात झाली होती. कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर 25 मार्चला आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले होते. त्यानंतरही सरकारी तेल कंपन्यांनी इंधन दरात कपात केली होती.
  • सुएझ कालव्यात महाकाय जहाज अडकल्याने सागरी मार्गातील वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर पुन्हा वाढले होते. सुएझ कालव्यातील अडकेले जहाज काढल्यानंतर कच्च्या तेलाचे दर पुन्हा घसरले आहेत. तीनवेळा इंधन दरात कपात केल्यानंत पेट्रोलचे दर 61 पैशांनी तर डिझेलचे दर 60 पैशांनी कमी झाले होते.
  • गतवर्षी मार्चमध्ये सरकारने उत्पादन शुल्काचे दर वाढविल्याने पेट्रोलचे दर प्रति लिटर 21.58 रुपयांनी वाढले होते. तर डिझेलचे दर प्रति लिटर 19.18 रुपयांनी वाढले होते. त्यावेळेस कोरोनाच्या संसर्गाची सुरुवात होत असताना इंधनाची मागणी कमी झाली होती. तरीही इंधनाचे दर वाढले होते.

हेही वाचा-शेअर बाजार निर्देशांक 1200 अंशाने वधारला; गाठला पुन्हा 50,000 चा टप्पा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.