बिझनेस डेस्क, ईटीव्ही भारत- सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर १०० रुपयाजवळ पोहोचले आहेत. तर डिझेलचे दर दिल्लीत प्रति लिटर ९० रुपयाजवळ पोहोचले आहेत.
देशातील जवळपास सर्वच महानगरांमध्ये पेट्रोलचे दर ९० रुपयांजवळ किंवा त्याहून अधिक वाढले आहेत. तर दिल्लीत डिझेलचे दर ९० रुपयांहून अधिक आहेत. सध्या असलेले पेट्रोल व डिझेलचे दर ४ ऑक्टोबर २०१८ मध्ये होते. तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ८० डॉलर होते.
हेही वाचा-महागाईचा भडका! खाद्यतेलाच्या किमतीत जानेवारीत २० टक्क्यांची वाढ
सार्वजनिक तेल कंपनीमधील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर येत्या काही दिवसांत पुन्हा वाढणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने नुकसान टाळण्याकरता कंपन्यांकडून इंधनाचे दर वाढविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा-किरकोळ बाजारपेठेत जानेवारीत महागाईचे प्रमाण कमी; ४.०६ टक्क्यांची नोंद
कशामुळे इंधनाचे दर वाढत आहेत?
- देशातील कच्च्या तेलाच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी ८५ टक्के तेल आयात करावे लागते.
- आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीप्रमाणे देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलण्यात येतात.
- आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर २ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ६२ डॉलरहून अधिक झाले आहेत.
- सौदी अरेबियाने कच्च्या तेलाचे उत्पादन कमी केल्याने त्यांच्या किमती वाढल्या आहेत.
- केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे राज्यसभेत सांगितले.
- गेल्या ३०० दिवसांमध्ये ६० दिवसांत इंधनाचे दर वाढले आहेत. तर ७ दिवस इंधनाचे दर कमी झाले आहेत. इंधनाचे दर २५० दिवस हे स्थिर राहिल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी राज्यसभेत सांगितले.