नवी दिल्ली - देशात पेट्रोल व डिझेलच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत. या दरवाढीनंतर पेट्रोलच्या किमतीने महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याने १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
देशात पेट्रोलचे दर आज प्रति लिटर २४ पैसे, तर डिझेलचे दर प्रति लिटर २९ पैशांनी वाढले आहेत. ही माहिती सरकारी तेल कंपन्यांनी दिली आहे. ही इंधनामधील महिनाभरातील चौदावी दरवाढ आहे. यापूर्वीच राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
हेही वाचा-पोलिसांकडून धमकाविण्याकरता वापरण्यात येणारी रणनीती चिंताजनक - ट्विटर
असे आहेत प्रमुख शहरांमधील इंधनाचे दर
- ठाण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर १००.०६ रुपये तर डिझेलचा दर ९१.९९ रुपये आहे.
- मुंबईत पेट्रोलचा दर ९९.९४ रुपये तर डिझेलचा दर ९१.८७ रुपये आहे.
- विविध राज्यांचा इंधनावरील व्हॅट भिन्न असल्याने पेट्रोल व डिझेलचे दर वेगवेगळे आहेत.
- दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर ९३.८४ आणि डिझेलचा दर ८४.६१ रुपये आहे.
- राजस्थानमधील श्री गंगानगर जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचे दर सर्वाधिक आहेत. या जिल्ह्यात पेट्रोलचा दर १०४.६७ व डिझेलचा दर ९७.४९ रुपये आहे.
हेही वाचा-जागतिक बाजारात अस्थिरता असतानाही निफ्टीने नोंदविला विक्रमी निर्देशांक
दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी ४ मे रोजीपासून इंधनाचे दर चौदावेळा वाढविले आहेत. या दरवाढीमुळे पेट्रोलचे दर प्रति लिटर ३.२८ रुपये व डिझेलचे दर ३.८८ रुपयांनी वाढले आहेत.