नवी दिल्ली - देशात पेट्रोल व डिझेलचे दर वाढत असल्याने महानगरांमध्ये महागाईचा उच्चांक होत आहे. महानगरांमध्ये मुंबई, हैदराबाद पाठोपाठ बंगळुरूमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर १०० रुपयांहून अधिक आहेत.
पेट्रोलच्या किमती प्रति लिटर २७ पैसे तर डिझेलचे दर प्रति लिटर २८ पैशांनी आज वाढले आहेत. सात आठवड्यांमध्ये २६ वी दरवाढ झाल्याने पेट्रोल व डिझेलच्या किमतीने नवा उच्चांक गाठला आहे.
हेही वाचा-सौदी अरेबियामधून भारतात परतण्याकरिता मदत करा; वाहन चालकाची भावनिक हाक
दिल्लीत पेट्रोलच्या दराने गाठला उच्चांक-
दिल्लीतील पेट्रोलचा दर आजपर्यंतचा सर्वाधिक आहे. दिल्ली पेट्रोल प्रति लिटर ९६.९३ रुपये तर डिझेल प्रति लिटर ८७.६९ रुपये आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंधप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलच्या दराने प्रति लिटर १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
हेही वाचा-गुजरात - अहमदाबादच्या साबरमती नदीत सापडला कोरोना विषाणू
या शहर-राज्यांमध्ये इंधनाचे दर सर्वाधिक-
पाकिस्तान सीमेलगत असलेल्या राजस्थानमधील श्री गंगानगर जिल्ह्यात पेट्रोलचा दर देशात सर्वाधिक प्रति लिटर १०८.०७ रुपये आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर १००.९२ रुपये आहे. कारण, राजस्थानमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर सर्वाधिक व्हॅट लागू आहे. त्यापाठोपाठ व्हॅटचे सर्वाधिक प्रमाण हे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि तेलंगाणामध्ये आहे.
हेही वाचा-आंबा, चक्क २ लाख रुपये किलो.. बागेच्या सुरक्षेसाठी ९ श्वान आणि ६ सुरक्षारक्षक
सात आठवड्यांमध्ये २६ वेळा इंधनांमध्ये दरवाढ-
गेल्या सात आठवड्यांमध्ये २६ वेळा दरवाढ झाल्याने पेट्रोलच्या किमती प्रति लिटर एकूण ६.५३ रुपयांनी वाढल्या आहेत. तर डिझेलचे दर प्रति लिटर एकूण ६.९६ रुपयांनी वाढल्या आहेत.
या कारणाने इंधनाच्या दरात वाढ-
सरकारी तेल कंपन्यांकडून आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती व विदेशी विनियमाचा आढावा घेतला जातो. त्यानुसार इंधनाचे दर सरकारी कंपन्यांकडून बदलण्यात येतात. भारतासह विविध देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण वाढल्याने कच्च्या तेलाची मागणी वाढत आहे. दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपया बळकट होत असल्याने आयातीसाठी लागणाऱ्या कच्च्या तेलासाठी सरकारला जादा पैसे मोजावे लागत आहेत.