ETV Bharat / business

वाहन उद्योगावर 'मंदीचे ग्रहण'; प्रवासी वाहनांच्या विक्रीत सलग १० व्या महिन्यात घसरण

देशातील कारच्या विक्रीत ऑगस्टमध्ये ४१.०९ टक्क्यांची घसरण झाली आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये देशात १ लाख ९६ हजार ८४७ कारची विक्री झाली होती. चालू वर्षात ऑगस्टमध्ये कारची विक्री कमी होवून  १ लाख १५ हजार ९५७ कारची विक्री झाली आहे. ही आकडेवारी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल्स मॅन्युफॅक्चुअर्सने (एसआयएएम) सोमवारी जाहीर केली आहे.

संग्रहित - वाहन उद्योग
author img

By

Published : Sep 9, 2019, 1:52 PM IST

नवी दिल्ली - वाहन उद्योगातील मंदी सलग १० व्या महिन्यातही सुरुच आहे. प्रवासी वाहनांच्या विक्रीत ऑगस्टमध्ये ३१.५७ टक्के घसरण झाली आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये २ लाख ८७ हजार १९८ वाहनांची विक्री झाली होती. चालू वर्षात ऑगस्टमध्ये १ लाख ९६ हजार ५२४ वाहनांची विक्री झाली आहे.

देशातील कारच्या विक्रीत ऑगस्टमध्ये ४१.०९ टक्क्यांची घसरण झाली आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये देशात १ लाख ९६ हजार ८४७ कारची विक्री झाली होती. चालू वर्षात ऑगस्टमध्ये कारची विक्री कमी होवून १ लाख १५ हजार ९५७ कारची विक्री झाली आहे. ही आकडेवारी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल्स मॅन्युफॅक्चुअर्सने (एसआयएएम) सोमवारी जाहीर केली आहे.

हेही वाचा-दूरसंचार, वाहन उद्योग आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रातील नवीन नोकऱ्यांच्या संख्येत घट

दुचाकींच्या विक्रीत गेल्या महिन्यात २२.३३ टक्के घसरण झाली होती. हे प्रमाण गतवर्षी ऑगस्टमध्ये १२ लाख ७ हजार ५ असताना यंदा ९ लाख ३७ हजार ४८६ झाले आहे. सर्व प्रकारच्या दुचाकींच्या विक्रीत ऑगस्टमध्ये २२.२४ टक्के घसरण झाली. चालू वर्षात सर्व प्रकारातील दुचाकींच्या विक्री १५ लाख १४ हजार १९६ एवढी झाली आहे. गतवर्षी १९ लाख ४७ हजार ३०४ दुचाकींची विक्री झाली होती.

हेही वाचा-मारुतीचे हरियाणाच्या प्रकल्पामधील २ दोन दिवस उत्पादन राहणार बंद

व्यवसायिक वाहनांच्या विक्रीत ३८.७१ टक्के घट झाली आहे. सर्व प्रकारच्या वाहनांची नोंदणी गतवर्षीच्या तुलनेत ऑगस्टमध्ये २३.५५ टक्क्यांनी घसरली आहे. एकंदरीत सर्व प्रकारच्या वाहनांची विक्री ऑगस्टमध्ये कमी झाली आहे.

हेही वाचा-ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदीचे सावट; महिंद्रासह मारुतीच्या वाहन विक्रीत ऑगस्टमध्ये घसरण

वाहन उद्योगापुढे मंदीचे आव्हान-
देशातील सर्वात मोठी वाहन कंपनी मारुती सुझुकी मंदीमधून जात आहे. कंपनीने गुरुग्राम आणि मनेसर प्रकल्पामधील उत्पादन दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मारुतीकडून ७ आणि ९ सप्टेंबरला उत्पादन प्रकल्पातील काम बंद ठेवण्यात येणार आहे. या दिवशी कोणतेही उत्पादन घेतले जाणार नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.

वित्तपुरवठ्याची कमतरता, जीएसटीचे अधिक प्रमाण व बीएस-४ वरून बीएस-५ वाहनांचे इंजिन करण्याचा नियम आदि कारणांनी वाहन उद्योग मंदीमधून जात आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.