नवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाने पॅन कार्डची आधारला जोडणी (लिंक) बंधनकारक करण्याचा निर्णय लागू केला आहे. प्राप्तिकर विभागाने वारंवार मुदतवाढ करूनही अनेकांनी पॅन कार्ड आधारला लिंक केले नाही. यावर प्राप्तिकर विभागाने आधारला जोडणी नसलेले पॅन कार्ड हे ३१ मार्च २०२० नंतर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्राप्तिकर विभागाने पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची मुदत अनेकदा वाढविण्यात आली आहे. सध्या ही मुदत ३१ मार्च २०२० करण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाच्या सूचनेनंतर २७ जानेवारी २०२० पर्यंत एकूण ३०.७५ कोटी नागरिकांनी पॅन हे आधारला जोडले आहेत. तरीही अजून १७.५८ कोटी पॅन हे आधारला जोडण्यात आलेले नाहीत.
हेही वाचा- टेलिफॉन ऑपरेटर कंपन्या 'गॅस'वर; दूरसंचार विभागाने 'हे' दिले आदेश
पॅन कार्ड हे आधारला जोडले नसेल तर ते चालणार नसल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानेही म्हटले आहे. जर पॅन कार्ड बंद झाले तर त्या करदात्याला प्राप्तिकर विभागाचे विवरण पत्र भरण्यात अडथळा येणार आहे.
हेही वाचा-हिरो मोटोकॉर्पकडून बीएस-६ इंजिनक्षमतेची स्प्लेंडर प्लस लाँच; एवढी आहे किंमत