ETV Bharat / business

'जीवनावश्यक वस्तुंच्या साठेबाजीसह दरवाढ नाही; सरकारकडून बाजारावर कडक देखरेख' - fruit price

पालेभाज्या, गहू, डाळी व तांदूळ यांच्या किमतीवर देखरेख ठेवण्यात येत आहे. टाळेबंदीत व नंतरही सर्व जीवनावश्यक वस्तू देशभरात उपलब्ध असणार आहेत, याची ग्वाही रामविलास पासवान यांनी दिली.

रामविलास पासवान
रामविलास पासवान
author img

By

Published : Apr 20, 2020, 8:42 PM IST

नवी दिल्ली - टाळेबंदीदरम्यान जीवनावश्यक वस्तुंचे दर वाढत असताना केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. बाजारातील वस्तुंची साठेबाजी व जीवनावश्यक वस्तूच्या एमआरपीपेक्षा (कमाल किरकोळ किंमत) जास्त नसाव्यात, यासाठी सरकार कडकपणे देखरेख करत असल्याचे पासवान यांनी सांगितले.

पालेभाज्या, गहू, डाळी व तांदूळ यांच्या किमतीवर देखरेख ठेवण्यात येत आहे. टाळेबंदीत व नंतरही सर्व जीवनावश्यक वस्तू देशभरात उपलब्ध असणार आहेत, याची ग्वाही देत असल्याचे रामविलास पासवान यांनी सांगितले.

हेही वाचा-भारताच्या नव्या एफडीआय नियमाने चीनचा तिळपापड; ही' दिली प्रतिक्रिया

देशाच्या काही भागात पालेभाज्य व फळांच्या किमती वाढल्या आहेत. यावर विचारले असता त्यांनी देशात पुरेसा साठा असल्याचे सांगितले. वाहतुकीच्या समस्येमुळे तांदळाच्या किमतीचा प्रश्न आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधून ८१ कोटो लाभार्थ्यांना रेशन मिळवून देण्यासाठी भारतीय अन्नधान्य महामंडळाचे (एफसीआय) कर्मचारी सतत कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा-आरबीआय पतधोरण समितीची बैठक एप्रिलऐवजी जूनमध्ये होणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.