ETV Bharat / business

सलग सोळाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर - पेट्रोल दर न्यूज

कोरोनावरील लस यशस्वी ठरल्याचे वृत्त येतात तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. त्यानंतर बाजारात पेट्रोल व डिझेलची मागणी वाढेल, अशी कंपन्यांना अपेक्षा होती. मात्र, नवीन कोरोनाचा विषाणू प्रकार सापडल्याने जगभरातील बाजारपेठांवर परिणाम झाला आहे. पुन्हा काही देशांत टाळेबंदी होण्याची भीती आहे.

पेट्रोल दर
पेट्रोल दर
author img

By

Published : Dec 23, 2020, 3:24 PM IST

नवी दिल्ली - सरकारी तेल कंपन्यांनी सलग १६ व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत.दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८३.७१ रुपये आहेत. तर डिझेलचे दर प्रति लिटर ७३.८७ रुपये आहेत. देशभरातील विविध शहरातही पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर राहिले आहेत.

कोरोनावरील लस यशस्वी ठरल्याचे वृत्त येतात तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. त्यानंतर बाजारात पेट्रोल व डिझेलची मागणी वाढेल, अशी कंपन्यांना अपेक्षा होती. मात्र, नवीन कोरोनाचा विषाणू प्रकार सापडल्याने जगभरातील बाजारपेठांवर परिणाम झाला आहे. पुन्हा काही देशांत टाळेबंदी होण्याची भीती आहे. या भीतीमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल ५० डॉलरहून कमी राहिला आहे.

हेही वाचा-कोरोना लस चाचणीकरता भारत बायोटेककडून १३ हजार स्वयंसेवकाची भरती

पेट्रोलचे दर २२ सप्टेंबर तर डिझेलचे दर २ ऑक्टोबरपासून बदलले नव्हते. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये पेट्रोल व डिझेलचे दर वाढले होते. तर ८ डिसेंबरनंतर पुन्हा पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर राहिले होते. सरकारी तेल कंपन्यांकडून जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीचा आढावा घेतला जातो. त्याप्रमाणे रोज पेट्रोल व डिझेलच्या किमती रोज सकाळी गरजेप्रमाणे बदलण्यात येतात.

हेही वाचा-'कोरोनानंतरच्या जगात भारताकरिता अगणित संधी उपलब्ध होणार'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.