ETV Bharat / business

'या' देशातील हॅकर भारतासह सहा देशांवर 21 जूनला करणार मोठा सायबर हल्ला ?

लॅझारस ग्रुपकडून सहा देशातील व्यावसायिक, लघू आणि मोठ्या उद्योजकांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये जपान, भारत, सिंगापूर, दक्षिण कोरिया, इंग्लंड आणि अमेरिका असल्याचे झेडनेटने अहवालात म्हटले आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Jun 20, 2020, 2:40 PM IST

नवी दिल्ली – जग कोरोनाच्या संकटापुढे झुंजत असताना सायबर हल्ल्याचे संकट भेडसावू लागले आहे. उत्तर कोरियाच्या सरकारचा पाठिंबा असलेले हॅकर हे भारतासह सहा देशांवर 21 जूनला मोठा सायबर हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यासाठी कोरोनाची संकल्पना असलेली फिशिंग मोहिम हॅकर राबविणार असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.

लॅझारस ग्रुपकडून सहा देशातील व्यावसायिक, लघू आणि मोठ्या उद्योजकांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये जपान, भारत, सिंगापूर, दक्षिण कोरिया, इंग्लंड आणि अमेरिका असल्याचे झेडनेटने अहवालात म्हटले आहे. या मोहिमेमधून उत्तर कोरियाच्या हॅकर गटाला आर्थिक लाभ मिळवायचा आहे. त्यासाठी काही फसवणुकीच्या वेबसाईटवर जावून लिंक करण्याची सूचना केली जावू शकते. त्यांच्याकडून वैयक्तिक व वित्तीय माहिती मागविली जावू शकते, असे सिंगापूर येथे मुख्यालय असलेल्या सायबर सुरक्षा सायफिर्मा कंपनीने म्हटले आहे.

हॅकर गटाने जपानमधील 11 लाख व्यक्तींची माहिती आणि ईमेलआयडी मिळविल्याचा दावा केला आहे. तर भारतामधील 20 लाख आणि इंग्लंडमधील 1 लाख 80 हजार व्यावसायिकांची माहिती मिळविल्याचा दावाही हॅकर गटाने केला होता. सिंगापूरमधील 8 हजार संस्थांना हॅकर गट लक्ष्य करणार असल्याचे सिंगापूर बिझनेस फेडरेशनने म्हटले आहे.

सायफिर्माचे संस्थापक आणि सीईओ कुमार रितेश म्हणाले, की सायबर हल्ल्याची सूचना सहा देशांनाही दिली आहे. सहा देशातील संस्थांना अलर्ट मिळाले आहेत. त्यावर त्या देशांतील सरकारी संस्था काम करत आहेत.

काय आहे लॅझारस हॅकर ग्रुप?

लॅझारस हॅकर ग्रुपचे नियंत्रण हे उत्तर कोरियाची प्राथमिक गुप्तचर यंत्रणा करते. यापूर्वी या ग्रुपने 2014 मध्य सोनी पिक्चर इंटरनेटमेंवर सायबर हल्ला केला होता. तर 2017 मध्या वॉनाक्राय या कॉम्प्युटर व्हायरसने अमेरिका, इंग्लंडमधील यंत्रणांना लक्ष्य केले होते.

गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये लॅझरस ग्रुपने भारतीय एटीएममधील माहिती आणि ग्राहकांची माहिती घेण्यासाठी मालवेअर तयार केला होता. या प्रकरणाचा छडा कॅस्परस्काय सिक्युरिटीच्या संशोधकांनी लावला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.