ETV Bharat / business

'या' राज्यातील रेशन दुकानात मिळणार मास्क

author img

By

Published : Apr 20, 2020, 7:46 PM IST

सरकारने खरेदी केलेले मास्क हे सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधून रेशन दुकानांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. मास्कच्या निर्मितीमधून ग्रामीण महिलांना रोजगार मिळणार असल्याचेही जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितले.

मास्क
मास्क

भोपाळ - मध्यप्रदेश सरकारने नागरिकांना रेशन दुकानांमधून मास्क देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सरकार कॉटनचे ५० लाख मास्क खरेदी करणार आहे. शहरी भागातील महिलांनी तयार केलेले मास्क सरकार खरेदी करणार असल्याचे जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितले.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मास्क खरेदी करण्याचा निर्णय रविवारी घेण्यात आला आहे. सरकारने खरेदी केलेले मास्क हे सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधून रेशन दुकानांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. मास्कच्या निर्मितीमधून महिलांना रोजगार मिळणार असल्याचेही जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा-भारताच्या नव्या एफडीआय नियमाने चीनचा तिळपापड; ही' दिली प्रतिक्रिया

पहिल्या टप्प्यात खरेदी करण्यात आलेले ५० लाख मास्क हे धुता येवू शकणारे मास्क आहेत. ज्या महिलांना मास्क तयार करायचे आहेत, त्यांना सरकारी वेबसाईटवरून नोंदणी करावी लागणार आहे. प्रत्येक महिलेला १ हजार मास्क तयार करण्याची ऑर्डर दिली जाणार असल्याचे जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा-विजय मल्ल्याला भारतात आणायचा मार्ग मोकळा, कारण...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.