नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी, टोयोटा किर्लोस्करने वाहन मालकांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. या वाहन कंपन्यांनी वाहनांची मोफत सेवा (सर्व्हिस) आणि वॉरंटी कालावधी वाढविला आहे. कोरोना महामारीमुळे वाहन कंपन्यांनी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मोफत सेवा आणि वॉरंटी कालावधी १५ मार्च २०२१ ते ३१ मे २०२१ पर्यंत संपणाऱ्या वाहनांचासाठी ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मारुती सुझुकीचे वरिष्ठ कार्यकारी संचालक (सेवा) पार्थो बॅनर्जी म्हणाले, की अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन असल्याने ग्राहकांना बाहेर फिरणे शक्य झाले नाही. वाहनांची मोफत सेवा आणि वॉरंटी वाढविल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा-नैनितालमधील आकर्षक आणि मजबूत भूकंपरोधक नैसर्गिक घरे!
टोयोटोनेही एक महिन्यांनी वाढविली वॉरंटी-
टोयोटोने वाहनांची मोफत वॉरंटी आणि सशुल्क वॉरंटी ही एक महिन्यांनी वाढविली आहे. कस्टमर कनेक्टर प्रोग्रॅम २.० हा कार्यक्रमही कंपनीने लाँच केला आहे. यामधून ग्राहकांना विनाअडथळा आणि सुरक्षितपणे सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे टीकेएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष नवनीत सोनी यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-भीमा कोरेगाव प्रकरण : सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज
टाटा मोटर्सनेही वॉरंटीला दिली मुदतवाढ
टाटा मोटर्सने बुधवारी वाहनांच्या वॉरंटी आणि मोफत सेवेला ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या वाहनांची वॉरंटी व मोफत सेवेची मुदत १ एप्रिल ते ३१ मेपर्यंत संपणार आहे, त्याच वाहनांना मुदतवाढ मिळणार आहे.