ETV Bharat / business

देशातील विमान कंपन्यांपुढे 'हे' आहे सर्वात मोठे संकट - aviation sector in India

विमान कंपन्यांना इंधनासाठी डॉलरमध्य मोठ्या प्रमाणात पैसे देताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विमान कंपन्यांकडून कमी वाहतूक होत असताना रुपयाची सतत घसरण होत आहे. हे बाजारातील जुळणारे गणित नसल्याचे विस्ताराचे मुख्य वाणिज्य अधिकारी विनोद कॅनन यांनी सांगितले.

विस्तारा कंपनी
विस्तारा कंपनी
author img

By

Published : Jun 27, 2020, 3:46 PM IST

नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटातही देशांतर्गत सेवा देणाऱ्या विमान कंपन्यांपुढे अडचणी आहेत. विमानांचे भाडे, देखभाल आणि विमान इंधनाकरता डॉलरमध्ये द्याव्या लागणाऱ्या पैशांचा प्रश्न भारतीय विमान कंपन्यांना भेडसावत आहे. विस्तारा विमान कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले, की जानेवारीपासून रुपयाची डॉलरच्या तुलनेत 6 टक्के घसरण झाली आहे. ते विमान वाहतूक सल्लागार कंपनी सीएपीएच्या वेबिनारमध्ये बोलत होते.

विमान कंपन्यांना इंधनासाठी डॉलरमध्ये पैसे देताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विमान कंपन्यांकडून कमी वाहतूक होत असताना रुपयाची सतत घसरण होत आहे. हे बाजारातील जुळणारे गणित नसल्याचे विस्ताराचे मुख्य वाणिज्य अधिकारी विनोद कॅनन यांनी सांगितले.

विमान भाड्याने देणाऱ्या कंपन्या आणि विमानाची देखभाल करणाऱ्या कंपन्यांना डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात, असे त्यांनी सांगितले. जानेवारीत भारतीय चलनाची ( एक रुपया) किंमत डॉलरच्या तुलनेत 71 रुपये होती. तर 25 जूनला एका डॉलरसाठी 75.65 रुपये द्याव लागत होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पुढे ते म्हणाले, हा प्रश्न कसा सोडवावा? याची मला खात्री नाही. कोरोना महामारी कधीही न घडलेली घटना आहे. देशातील आणि जगातील विमान कंपन्या अडचणीत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, नियोजत आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तर दोन महिन्यानंतर केंद्र सरकारने 25 मेपासून देशांतर्गत विमान वाहतूक सेवा सुरू केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.