नवी दिल्ली - अर्थव्यवस्थेच्या संकटात देशाला मोठा दिलासा मिळू शकणार आहे. केंद्र सरकारच्या कच्च्या तेलाच्या आयातीचे बिल आणखी कमी होणार आहे. कारण, सौदी अरेबिया कच्च्या तेलाच्या खरेदी करणाऱ्या आशियातील देशांना सवलत देण्यावर विचार करत आहे.
सौदी अरेबियातील कच्च्या तेलाच्या कमी कमी झाल्या आहेत. तसेच कच्च्या तेलाच्या शुद्धीकरण प्रकल्पाच्या नफ्यातही घट झाली आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर सौदी अरेबियाकडून कच्च्या तेलाच्या प्रति बॅरलवर १० ते २० टक्के सवलत दिला जाण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या खरेदीवर डिसेंबरपासून सवलत मिळण्याची शक्यता आहे.
गरजेच्या एकूण ८५ टक्क्यांहून अधिक कच्च्या तेलाची आयात
सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या खरेदीवर सवलत दिल्यास देशाच्या आयातीच्या बिलात मोठी कपात होण्याची शक्यता आहे. देशाला लागणाऱ्या ८५ टक्क्यांहून अधिक कच्च्या तेलाची आयात करण्यात येते. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमधील फरकाने देशाला मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो.
आंतरराष्ट्रीय बाजारात खनिच तेलाचे दर घसरले-
दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारातही कच्च्या तेलाच्या किमती कमी होत आहे. कोरोना महामारीचे संकट कमी होईपर्यंत कच्च्या तेलाची मागणी वाढण्याची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा मागणीहून अधिक पुरवठा आहे.
दरम्यान, कच्च्या तेलाचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति बॅरल ४२ डॉलरहून ३८ डॉलरवर पोहोचला आहे.