ETV Bharat / business

'दुष्काळात तेरावा'... सोने महागल्याने 'सुवर्णनगरी'च्या बाजारपेठेत मंदीचे चित्र - सोने खरेदी

स्थानिक बाजारपेठेत सोन्याचे दर गेल्या तीन दिवसात तब्बल १  हजार १०० रुपये ते १२०० रुपयांनी वाढले आहेत. जळगावात शनिवारी सकाळी सोन्याचा दर  प्रति तोळा ३४ हजार ४०० रुपये एवढा झाला. चालू आठवड्यात तीन ते चार दिवसांपूर्वी सोन्याचा दर ३३  हजार २००  ते ३३ हजार ३००  रुपये प्रति तोळा होता. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकन डॉलर भारतीय रुपयाच्या तुलनेत सतत वधारत असल्याने सोन्याचे दर वाढतच आहेत.

सोने खरेदी
author img

By

Published : Jun 22, 2019, 3:29 PM IST

Updated : Jun 22, 2019, 5:08 PM IST

जळगाव - हौसेला मोल नसते, असे म्हणत अनेकजण सोन्याची खरेदी करतात. मात्र तीन दिवसात तब्बल १२०० रुपयाने सोन्याचे प्रति तोळा दर वाढल्याने अनेकांचा हिरमोड होत आहे. सोन्याची बाजारपेठ असल्याने जळगावला सुवर्णनगरी म्हणून ओळखले जाते. याचा फटका येथील सोन्याच्या बाजारपेठेला बसत आहे. आधीच दुष्काळामुळे ग्राहकांची कमी मागणी त्यात दरवाढ, याचा परिणाम म्हणून सोन्याच्या बाजारपेठेत मंदी असल्याचे चित्र आहे.

स्थानिक बाजारपेठेत सोन्याचे दर गेल्या तीन दिवसात तब्बल १ हजार १०० रुपये ते १२०० रुपयांनी वाढले आहेत. जळगावात शनिवारी सकाळी सोन्याचा दर प्रति तोळा ३४ हजार ४०० रुपये एवढा झाला. चालू आठवड्यात तीन ते चार दिवसांपूर्वी सोन्याचा दर ३३ हजार २०० ते ३३ हजार ३०० रुपये प्रति तोळा होता. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकन डॉलर भारतीय रुपयाच्या तुलनेत सतत वधारत असल्याने सोन्याचे दर वाढतच आहेत.

सोने खरेदी

एरवी अक्षय्य तृतीयेनंतर लग्नसराई आटोपत असल्याने सोन्याची मागणी घटते. त्यामुळे सोन्याचे दर कमी होतात किंवा स्थिर राहतात, असे बाजारपेठेमधील स्थिती असते. मात्र, यंदा अक्षय्य तृतीयेनंतर सोन्याचे दर सतत वाढत आहेत. आधीच दुष्काळामुळे सोन्याची मागणी घटली आहे. त्यातच दर सतत वधारत असल्याने ग्राहक सोने खरेदीसाठी पुढे सरसावत नाही. त्यामुळे सराफ बाजारात मंदी दिसून येत आहे.
यावर्षी मार्च महिन्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याचे दर ३३ हजार रुपये प्रति तोळा झाला होता.

दरम्यान, एकीकडे सोन्याचे दर वाढत असताना चांदीच्या दरातही किंचितशी वाढ नोंदवली गेली आहे. चालू आठवड्यात ३८ हजार ५०० रुपये प्रति किलो असलेली चांदी ५०० रुपयांनी वाढून ३९ हजार रुपये प्रतिकिलो झाली आहे. मार्च महिन्यापासून जून महिन्यापर्यंत चांदीचे दरदेखील टप्प्याटप्प्याने वाढत असल्याचे सराफ बाजारात दिसून आले आहे.

सराफ दुकानदारांची वाढली चिंता-
सोने खरेदी करण्यासाठी आलो असताना दर वाढल्याचे ऐकून हा निर्णय रद्द केल्याचे एका ग्राहकाने सांगितले. तर दुसऱ्या एका ग्राहकाने दर कमी झाले तर सोने खरेदी करू, असे म्हटले आहे. सोने महागल्याने ग्राहक दुकानातून पाठ फिरवित असताना सराफ दुकानदारांची चिंता वाढली आहे.

या कारणाने आंतरराष्ट्रीय सोने बाजारपेठेत वाढले दर -
अमेरिका-इराणमधील तणावाची स्थिती असल्याने जागतिक आर्थिक मंचावर तणावाची स्थिती आहे. दुसरीकडे अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे जगभरातील चिंताग्रस्त झालेल्या गुंतवणुकदारांनी सुरक्षित अशा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. ही मागणी वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर वाढले आहेत.

Intro:जळगाव
रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर वधारल्याने तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी वाढल्याने स्थानिक बाजारपेठेत सोन्याचे दर गेल्या तीन दिवसात तब्बल अकराशे ते बाराशे रुपयांनी वाढले आहेत. सुवर्णनगरी असलेल्या जळगावात शनिवारी सकाळी सराफ बाजार सुरू झाला तेव्हा सोन्याचे दर 34 हजार 400 रुपये प्रतितोळा होते. दुसरीकडे, अमेरिका व इराण यांच्यात सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या दराने उसळी घेतली आहे.

Body:चालू आठवड्यात तीन ते चार दिवसांपूर्वी सोन्याचे दर 33 हजार 200 ते 33 हजार 300 रुपये प्रतितोळा होते. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकन डॉलर भारतीय रुपयाच्या तुलनेत सतत वधारत असल्याने सोन्याचे दर वाढतच आहेत. गेल्या तीन दिवसात सोन्याचे दर तब्बल अकराशे ते बाराशे रुपयांनी वाढले आहेत. विशेष म्हणजे, अक्षय्य तृतीयेनंतर सोन्याचे दर सतत वाढत आहेत. एरवी अक्षय्य तृतीयेनंतर लग्नसराई आटोपते. त्यामुळे सोन्याची मागणी घटते. या प्रमुख कारणामुळे सोन्याचे दर एक तर कमी होतात किंवा स्थिर राहतात, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र, यावर्षी सराफ बाजारात वेगळे चित्र दिसत आहे. आधीच दुष्काळामुळे सोन्याची मागणी घटली आहे; त्यातच दर सतत वधारत असल्याने ग्राहक सोने खरेदीसाठी पुढे सरसावत नसल्याने सराफ बाजारात मंदी आहे.

यावर्षी मार्च महिन्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याचे दर 33 हजार रुपये प्रतितोळा इतके पोहोचले होते. तेव्हापासून अमेरिकन डॉलरचे मूल्य भारतीय रुपयापेक्षा जास्तच असल्याने सोन्याचे दर वाढतच आहेत. सोन्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारात दलाल सक्रिय झाल्याचा देखील परिणाम भारतीय स्थानिक सराफ बाजारावर झालेला पाहायला मिळत आहे.

Conclusion:दरम्यान, एकीकडे सोन्याचे दर वाढत असताना चांदीच्या दरातही किंचितशी वाढ नोंदवली गेली आहे. चालू आठवड्यात 38 हजार 500 रुपये प्रतिकिलो असलेली चांदी 500 रुपयांनी वाढून 39 हजार रुपये प्रतिकिलो झाली आहे. मार्च महिन्यापासून आता जून महिन्यापर्यंत चांदीचे दर देखील टप्प्याटप्प्याने वाढत असल्याचे निरीक्षण सराफ बाजारात नोंदवण्यात आले आहे.
Last Updated : Jun 22, 2019, 5:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.