नवी दिल्ली - केंद्र सरकारने कोरोनाच्या लढ्यासाठी चांगले नियोजन केले. त्यामुळेच देशाच्या जीडीपीत २४ टक्क्यांची घसरण व देशात १२ कोटी नोकऱ्या संपलेल्या आहेत. देश रसातळाला गेला आहे, असा उपरोधिक टोला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.
केंद्र सरकारच्या कोरोना लढ्याच्या नियोजनामळे सरकारवरील अतिरिक्त कर्जाचा बोझा वाढला आहे. जगात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आणि कोरोनाच्या मृत्यूंची संख्या देशात असल्याकडे राहुल गांधींनी सरकारचे लक्ष वेधले आहे.
हेही वाचा-भारतातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर
राहुल गांधी म्हणाले, की केंद्र सरकारने कोरोनाच्या लढ्यासाठी केलेल्या चांगल्या नियोजनाने देशाच्या जीडीपीत २४.२ टक्के एवढी ऐतिहासिक घसरण झाली आहे. त्यामुळेच देश रसातळाला गेला आहे. मात्र, तरीही सरकार आणि माध्यमांकडून सब चंगा सी (सर्व काही चांगले आहे) असे सांगण्यात येत आहे. देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीतून समोर येत आहे.
हेही वाचा-ब्रिटिशकालीन जलविद्युत प्रकल्प ठरतोय भारतीय विद्युत ऊर्जा इतिहासाचा गौरवशाली वारसा-
मोदी सरकारकडून कोरोना महामारीचा प्रश्न व्यवस्थित हाताळण्यात येत नसल्याचा आरोपही काँग्रेसने केला. यापूर्वी केंद्र सरकारने काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळले होते.