नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात जगभरात औषधांचा पुरवठा करून दिलासा देणाऱ्या भारताने आणखी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. पॅरासिटामॉलच्या सक्रिय घटकद्रव्यांच्या (एपीआय) निर्यातीवरील निर्बंध सरकारने हटविले आहेत.
केंद्र सरकारने पॅरॉसिटामॉलची सक्रिय घटकद्रव्ये आणि पॅरासिटामॉलपासून तयार केलेल्या औषधांच्या निर्यातीवर ३ मार्चपासून निर्बंध लागू केले होते. कोरोना महामारीमुळे देशात पुरेसा औषधांचा साठा राहावा, यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले होते.
हेही वाचा-'या' कारणामुळे भारतातून आयात होणाऱ्या डुक्कराच्या मांसावर चीनमध्ये बंदी
केंद्र सरकारने १७ एप्रिलला पॅरासिटामॉलपासून तयार केलेल्या फॉर्म्युलेशनवरील निर्बंध हटविले होते. पॅरासिटामॉलच्या सक्रिय घटकद्रव्यांच्या निर्यातीवरीलही निर्बंधही विदेश व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) हटविले आहेत.
हेही वाचा-कोरोनाने नोकऱ्यांना 'ग्रहण'; रिनॉल्ट कंपनीकडून १५ हजार कर्मचारी कपात
दरम्यान, भारताने कोरोनाच्या संकटात पॅरासिटामॉल आणि हायड्रोक्सिक्लोक्विनचा पुरवठा १२० हून अधिक देशामध्ये केला आहे. भारतामधील औषधे दर्जेदार आणि कमी किमतीत असल्याने त्यांना जगभरात मागणी आहे.