नवी दिल्ली - भविष्य निवार्ह निधी खाते असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे किमान पेन्शन वाढविण्याबाबत केंद्रीय कामगार मंत्रालय विचार करत आहे. ही माहिती केंद्रीय कामगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी लोकसभेत दिली. सरकारच्या निर्णयानंतर हे पेन्शन हे ४ हजार ६७१ रुपये होणार आहे.
सध्या किमान पेन्शन १००० रुपये आहे. यात वाढ करण्याची काही सदस्यांची मागणी असल्याचे केंद्रीय कामगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी लोकसभेत सांगितले. भविष्य निर्वाह निधी संस्था (एपीएफओ) आणि सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजबरोबर चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मासिक पेन्शन ३ हजार रुपये केल्यास सरकारला ११ हजार ६९६ कोटी खर्च करावे लागतील, अशी त्यांनी माहिती दिली.
समितीने किमान मासिक पेन्शन वाढविण्याची शिफारस केली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यापूर्वी मोदी सरकारने २०१४ मध्ये पेन्शनमध्ये वाढ केली होती, असेही त्यांनी सांगितले.