नवी दिल्ली - सोन्याच्या भावातील घसरणीने आज निचांक नोंदविला आहे. सोने प्रति तोळा १६३ रुपयाने घसरले आहे. ज्वेलर्सकडून घटलेली मागणी आणि विदेशातील कमी झालेली सोन्याची विक्री याचा परिणाम झाल्याचे ऑल इंडिया सराफा असोसिएशनने म्हटले आहे.
चांदीचा भाव हा प्रति किलो ८० रुपयाने घसरून ४३ हजार २० रुपये झाला आहे. औद्योगिक कंपन्या आणि नाणे निर्मीती करणाऱ्या उद्योगाकडून कमी झालेली मागणी यामुळे चांदीचे भाव घसरले आहेत. सार्वभौम सोन्याचे दर प्रति आठ ग्रॅमसाठी २७ हजार ६०० रुपयावर स्थिर राहिले आहेत.
सोमवारी सोन्याचे दर ८०० रुपयांनी वाढून भाववाढीचा झाला होता उच्चांक
सोन्याचा दर प्रति तोळा ८०० रुपयांनी वाढून भाववाढीचा सोमवारी ( ५ ऑगस्ट) उच्चांक गाठला होता. सोन्याचा दर प्रति तोळा ३६ हजार ९७० रुपये झाला होता. चीन-अमेरिकेमधील व्यापारी युद्ध पुन्हा पेटले असताना विदेशी गुंतवणूकदारांनी सोने खरेदीला प्राधान्य दिले होतो. त्याचा परिणाम म्हणून सोन्याचे भाव वाढले होते.