नवी दिल्ली- शेतकऱ्यांना फायदेशीर असणारे सीएनजी ट्रॅक्टर लवकरच लाँच होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे सीएनजी ट्रॅक्टरचे शुक्रवारी लाँचिग करणार आहेत. या ट्रॅक्टरचा वापर केल्याने वर्षभरात १ लाख रुपयांचे इंधन वाचू शकते, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटले आहे.
देशात पहिल्यांदाच डिझेल ट्रॅक्टर हे सीएनजीमध्ये रुपांतरित केल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटले आहे. त्यासाठी रॉमॅट टेक्नो सोल्यूशन्स आणि टोमॅसेट्टो अशिले इंडियाने तंत्रज्ञानाची मदत केली आहे. सीएनजी ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांच्या पैशात बचत होऊ शकते, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.
हेही वाचा-इंधनात दरवाढीचा भडका; मुंबईत पेट्रोलचा दर शंभरीजवळ!
सीएनजी ट्रॅक्टरच्या लाँचिंगवेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर आदी उपस्थित राहणार आहे. सीएनजी ट्रॅक्टरमुळे स्वच्छ इंधनाचा वापर होणार आहे. त्यामधून कार्बनचे कमी उत्सर्जन होण्याकरता मदत होणार असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. सीएनजी टँकमध्ये सील बसविण्यात आले आहे. त्यामुळे इंधन भरताना स्फोट होण्याचा धोका कमी होतो.
हेही वाचा-सोने किंचित महाग; चांदीच्या किमतीत प्रति किलो ४५४ रुपयांची वाढ