नवी दिल्ली - दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) नुकतेच जाहीर केलेल्या प्रसारण वाहन्यांच्या शुल्क नियमातील सुधारणेवर भूमिका स्पष्ट केली आहे. नव्या नियमामुळे प्रसारण वाहिन्यांवर निर्बंध लागू होणार नसल्याचे ट्रायने म्हटले आहे.
आघाडीच्या प्रसारण वाहिन्यांनी ट्रायच्या नव्या नियमावर टीका केली होती. शुल्क असलेल्या वाहिन्यांवर निर्बंध लागू केल्यास ते व्यवसायामधून बाहेर पडतील, अशी भीतीही प्रसारण वाहिन्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर टीकेचे धनी झालेल्या ट्रायने प्रसारण वाहिन्यांना किंमती ठरविण्याची पूर्ण लवचिकता असल्याचेही म्हटले आहे.
संबंधित बातमी वाचा-ट्रायची प्रेक्षकांना नववर्षाची भेट : कमी पैशात दिसणार जादा प्रसारण वाहिन्या
प्रसारण वाहिन्यांसाठीचा राष्ट्रीय भाडे आदेश (एनटीओ) हा गतववर्षी फेब्रुवारीपासून अंमलात आणण्यात आला. तर ट्रायने एनटीओच्या नियमात बदल केल्याची १ जानेवारी २०२० ला घोषणा केली.
असे आहेत ट्रायचे नवे नियम-
डीटीएच कंपन्यांना (डिस्ट्रीब्युटिशन प्लॅटफॉर्म ऑपरेटर्स) सहा महिन्याच्या पॅकवर शुल्क आकारताना सवलत देण्याची ट्रायने परवानगी दिली आहे. सध्या डीटीएच कंपन्यांकडून केवळ वार्षिक शुल्कावर सवलती देण्यात येतात. ज्या प्रसारण वाहिन्यांचे शुल्क १२ रुपये किंवा त्याहून कमी आहे, अशा वाहिन्यांचाच पॅकमध्ये समावेश करता येणार आहे. त्यामुळे १२ रुपयाहून अधिक पॅक असलेल्या वाहिन्या ग्राहकांना स्वतंत्रपणे घेता येणार आहेत. ट्रायचे नवे दर १ मार्चपासून लागू होणार आहेत.
हेही वाचा-कारखानदारीला सुगीचे दिवस; साखर निर्यातीत 28 लाख टनांची वाढ