ETV Bharat / business

कोरोना: अफवांमुळे चिकन व्यवसायाला २२ हजार ५०० कोटी रुपयांचे नुकसान - कोरोना हैदराबाद

सध्या चिकन उद्योगामुळे देशातील १० लाख कुक्कुट पालकांना रोजगार मिळत असून त्यांच्याकडून देशातील जीडीपीला १ लाख ३ कोटी रुपयांचे थेट योगदान मिळते. मात्र, आता कोरोनामुळे या व्यवसायाला ग्रहन लागले आहे.

corona hyderabad
प्रतिकात्मक
author img

By

Published : Apr 3, 2020, 4:04 PM IST

हैदराबाद- देशात कोरोनाचे संक्रमण आणि त्या पार्श्वभूमीवर केलेले लॉकडाऊन हे कुक्कुटपालन व्यवसायासाठी धोक्याचे ठरले आहे. देशातील कुक्कुटपालन व्यवसायाला फेब्रुवारी महिन्यापासून सुमारे २२ हजार ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे अखील भारतीय कुक्कुटपालन संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देऊन आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

निवेदनात अखील भारतीय कुक्कुटपालन संघटनेने आर्थिक मदत, कर्जाची पुनर्रचना, अनुदान याबाबत मागणी केली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात चिकन आणि अंडे खालल्याने कोरोना होतो, अशी अफवा पसरली होती. या अफवेमुळे चिकन व्यवसायाला मोठे नुकसान झाले आहे, असे अखील भारतीय कुक्कुटपालन संघटनेचे अध्यक्ष सुरेश चितुरी यांनी सांगितले.

काही काळा नंतर चिकन व्यवसायाला थोडी गती मिळाली होती. आम्ही चिकन खाने हे सुरक्षित असल्याचे स्पष्टीकरण देखील दिले होते. मात्र, चिकन आणि अंड्यांच्या आंतर-राज्यीय वाहतुकीमध्ये अडथळे आल्याने चिकन व्यवसायाला पून्हा मोठा फटका बसला, असेही सुरेश चितुरी यांनी सांगितले.

सध्या चिकन उद्योगामुळे देशातील १० लाख कुक्कुट पालकांना रोजगार मिळत असून त्यांच्याकडून देशातील जीडीपीला १ लाख ३ कोटी रुपयांचे थेट योगदान मिळते. मात्र, आता कोरोनामुळे या व्यवसायाला ग्रहन लागले आहे.

हेही वाचा- बाजारात 500 ट्रक कांद्यांची आवक; 800 ते हजार रूपये प्रतिक्विंटल भाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.