नवी दिल्ली - देशभरात पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीने सामान्यांच्या खिशाला पुन्हा आज कात्री लागली आहे. या दरवाढीने राजस्थानमधील पाकिस्तान सीमेलगत असलेल्या श्री गंगानगर शहरात कहर केला आहे. या शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर १०० रुपयांहून अधिक आहे. यापूर्वीच गंगानगरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १०७.२३ रुपये लिटर आहे.
श्री गंगानगर शहरामध्ये फेब्रुवारीत पेट्रोलचा दर प्रति लिटर १०० रुपयांहून अधिक झाले आहेत. शनिवारी डिझेलचे दर प्रति लिटर २५ पैशांनी वाढल्यानंतर डिझेल प्रति लिटर १००.०६ रुपये आहे.
हेही वाचा-स्टेट बँकेकडून कोरोना रुग्णांकरिता 'कवच वैयक्तिक कर्ज योजना'
राजस्थानमधील पाकिस्तानलगतच्या शहरांमध्येही लवकरच डिझेलचे दर प्रति लिटर १०० रुपयांहून अधिक पोहोचण्याची शक्यता आहे. व्हॅटचे जादा दर असलेल्या मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाणा आणि आंध्रप्रदेशमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर १०० रुपयांहून अधिक आहेत. तर देशातील काही शहरांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून प्रिमीयम पेट्रोलचा दर प्रति लिटर १०० रुपयांहून अधिक आहे.
हेही वाचा-अॅमेझॉनसह फ्लिपकार्टचा सीसीआयकडून होणार तपास; कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
- गेल्या सहा आठवड्यांपासून सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाचे दर वाढविण्यास सुरुवात केली आहे.
- शनिवारीही पेट्रोल व डिझेलचे दर प्रति लिटर २२ ते ३२ पैशांनी वाढले आहेत.
- दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर २७ पैशांनी वाढून ९६.१२ रुपये आणि डिझेलचे दर प्रति लिटर २३ पैशांनी वाढून ८६.९८ रुपये आहे.
- मुंबईत पेट्रोलच्या दराने २९ मे रोजी प्रथम १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
- शनिवारी मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर १०२.३६ रुपये आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर ९४.४५ रुपये आहे.
- महानगरांमध्ये सर्वाधिक डिझेलचे दर मुंबईमध्ये सर्वाधिक आहेत.
- चालू वर्षात १ मे रोजीपासून इंधनाचे दर हे २३ दिवस वाढले आहेत. तर २० दिवस इंधनाचे दर स्थिर राहिले आहेत. या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ५.७२ रुपयांनी वाढले आहेत. तर डिझेलचे दर प्रति लिटर ६.२६ रुपयांनी वाढले आहेत.
हेही वाचा-जीएसटी परिषदेची आज बैठक; कोरोना लशींसह औषधांवरील जीएसटीबाबत होणार निर्णय