ETV Bharat / business

तिसऱ्या लाटेतील मुलांना धोका : कोव्हॅक्सिनची २ ते १८ वयोगटाकरता होणार चाचणी - ubject Expert Committee

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार विषयतज्ज्ञ समितीने सविस्तर माहिती घेतल्यानंतर कोव्हॅक्सिनची दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीसाठी परवानगी दिली आहे. कंपनीने दुसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीची आकडेवारी ही तिसऱ्या टप्प्यातील चाचणीपूर्वी सरकारला द्यावी लागणार आहे.

कोव्हॅक्सिन
कोव्हॅक्सिन
author img

By

Published : May 12, 2021, 5:20 PM IST

Updated : May 12, 2021, 5:28 PM IST

नवी दिल्ली - तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचा अंदाज असताना केंद्र सरकारच्या अभ्यास समितीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या अभ्यास समितीने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनची २ ते १८ वर्षे वयोगटासाठी दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यांसाठी शिफारस केली आहे.

कोव्हॅक्सिनची लहान मुलांवरील वैद्यकीय चाचणी ही एम्स, दिल्ली, एम्स पाटणा आणि नागपूरमधील मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये येथे घेण्यात येणार आहेत.

२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवरील लशींच्या परिणामांची घेतली जाणार माहिती

कोविड १९ च्या सेंट्रल ड्रग्स स्टँण्डर्ड कंट्रोल ऑरगायझेशनच्या (सीडीएससीओ) विषयतज्ज्ञ समितीने (एसईसी) हैदराबादमधील भारत बायोटेकला लहान मुलांवरील वैद्यकीय चाचणीची परवानगी दिली आहे. या चाचणीदरम्यान २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवरील सुरक्षितता, प्रतिकारक्षमता आणि प्रतिक्रियात्मकता तपासली जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील चाचणीची आकडेवारी सरकारकडे द्यावी लागणार

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार विषयतज्ज्ञ समितीने सविस्तर माहिती घेतल्यानंतर कोव्हॅक्सिनची दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीसाठी परवानगी दिली आहे. कंपनीने दुसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीची आकडेवारी ही तिसऱ्या टप्प्यातील चाचणीपूर्वी सरकारला द्यावी लागणार आहे.

कोव्हॅक्सिन या कोरोना लस प्रतिबंधात्मक लशीची निर्मिती भारत बायोटेकने सरकारी संस्था आयसीएमआरच्या सहकार्याने केली आहे. आपत्कालीन काळामुळे या लशीचा वापर करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. देशात लहान मुलांसाठी लस उपलब्ध नसल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, अमेरिकेत फायझर कंपनीला १२ वर्षे ते १८ वयोगटासाठी कोरोना लस देण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.

Last Updated : May 12, 2021, 5:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.