ETV Bharat / business

रुग्णालयाकडून कॅशलेस उपचार मिळत नसल्यास राज्य सरकारकडे तक्रार करा- आयआरडीएआय

विमा कंपन्यांनी सर्व नेटवर्क पुरवठादारामध्ये अडचणींता तोडगा काढण्यासाठी प्रभावी संवाद ठेवावा, असे निर्देश आयआरडीएआयने विमा कंपन्यांना दिले आहेत. विमाधारकाकडून आगाऊ रकमेची मागणी करणे हे रुग्णालय आणि विमा कंपनीमधील कराराचे स्पष्टपणे उल्लंघन आहे.

Insurance
विमा
author img

By

Published : Apr 24, 2021, 7:54 PM IST

नवी दिल्ली - कोरोनावरील उपचारात विमाधारकांकडून काही रुग्णालये जादा पैसे आकारणे व रोख रकमेचे आग्रह धरत असल्याचे प्रकार समोर आले होते. त्याची दखल घेत भारतीय विमा नियामक प्राधिकरणाने (आयआरडीएआय) विमाधारकांना संबंधित विमा कंपन्यांबाबत राज्य सरकारच्या यंत्रणेकडे तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला आहे.

विमा कंपन्यांनी सर्व नेटवर्क पुरवठादारामध्ये अडचणींता तोडगा काढण्यासाठी प्रभावी संवाद ठेवावा, असे निर्देश आयआरडीएआयने विमा कंपन्यांना दिले आहेत.

हेही वाचा-ऑक्सिजन पुरवठ्यात कोणी अडथळा आणत असेल तर फासावर लटकवा-दिल्ली उच्च न्यायालय

काय म्हटले आहे आयआरडीएआयने परिपत्रकात?

  • सर्व नेटवर्क पुरवठादारांकडून (रुग्णालये आदी) विमाधारकांना रोकडविरहित सेवा मिळण्याबाबत विमा कंपन्यांनी खात्री करावी.
  • जर विमाधारकाला रोकडविरहित सेवा मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होत असेल तर त्यांनी विमाधारकांच्या तक्रारीवर तोडगा काढण्यासाठी प्रभावी संवाद ठेवावा, असे आयआरडीएआयने परिपत्रकात म्हटले आहे.
  • जर अतिरिक्त शुल्क किंवा रोकडविरहित सुविधा देण्यास नकार देण्यात आला तर संबंधित राज्य सरकारकडे योग्य कारवाई करण्यासाठी तक्रार करावी, असे आयआरडीएआयने परिपत्रकात म्हटले आहे.
  • विमाधारकाकडून आगाऊ रकमेची मागणी करणे हे रुग्णालय आणि विमा कंपनीमधील कराराचे स्पष्टपणे उल्लंघन आहे.
  • कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कठीण काळ असताना नेटवर्क पुरवठादार रुग्णालयांनी अधिक चांगले काम करावे, अशी विनंती विमा नियामक प्राधिकरणाने म्हटले आहे.
  • कोरोनाच्या उपचाराचा समावेश असलेल्या विम्यात सर्व विमाधारकांना रोकडविरहित उपचार करावेत, असेही आयआरडीएआयने म्हटले आहे.
  • आरोग्य विमा योजनेतील दावे त्वरित निकालात काढण्याचे आदेशही आयआरडीएने विमा कंपन्यांना दिले आहेत.

हेही वाचा-कोव्हिशिल्डची किंमत बाजारपेठेत सर्वात कमी; सीरमकडून दराबाबत स्पष्टीकरण

दरम्यान, रोकडविरहित उपचाराचे दावे फेटाळणाऱ्या विमा कंपन्यांबाबतच्या तक्रारींवर त्वरित कृती करण्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयआरडीएआयला गुरुवारी निर्देश दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.