ETV Bharat / business

Amul Milk Rate : अमुलचे दूध 'या' दिवसापासून प्रति लिटर 2 रुपयांनी वाढणार - अमुल दूध नवीन दर

गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन ( GCMMF Amul rate hike ) कंपनीने संपूर्ण भारतात दुधाचे दर प्रति लिटर 2 रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दुधाचे दर कमाल किरकोळ किमतीच्या ( Amul Milk MRP Rate ) 4 टक्के आहेत. प्रत्यक्षात दुधाची दरवाढ ही अन्नातील महागाईच्या तुलनेत कमी असल्याचे जीसीएमएमएफने ( Cooperative GCMMF ) म्हटले आहे.

अमुलचे दूध
अमुलचे दूध
author img

By

Published : Feb 28, 2022, 7:15 PM IST

नवी दिल्ली- सहकारी संस्था जीसीएमएमएफने दुधाचे दर आणि दुग्धजन्य उत्पादनाचे दर वाढविण्याचा ( Amul Milk MRP Rate ) निर्णय घेतला आहे. दुधाचे दर प्रति लिटर 2 रुपयांनी वाढणार आहेत. हे दर 1 मार्चपासून वाढणार ( Amul rate new price ) आहेत.

गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन ( GCMMF Amul rate hike ) कंपनीने संपूर्ण भारतात दुधाचे दर प्रति लिटर 2 रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दुधाचे दर कमाल किरकोळ किमतीच्या ( Amul Milk MRP Rate ) 4 टक्के आहेत. प्रत्यक्षात दुधाची दरवाढ ही अन्नातील महागाईच्या तुलनेत कमी असल्याचे जीसीएमएमएफने ( Cooperative GCMMF ) म्हटले आहे.

हेही वाचा-Indian Students in Ukraine : बेलगोरोड मार्गाने विद्यार्थ्यांना बाहेर काढावे, पवार-जयशंकर यांच्यात चर्चा, मोदी चार केंद्रिय मंत्री युक्रेन शेजारील देशात पाठवणार

अहमदाबाद आणि सौराष्ट्र बाजारपेठेत अमुल गोल्डची किंमत ( 500 मिलीलीटर ) 30 रुपये, अमुल ताजाकरिता ( 500 मिलीलीटर ) 24 रुपये, अमुल शक्तीकरिता 27 रुपये ( 500 मिलीलीटर ) असे दुधाचे दर असणार आहे. गेल्या दोन वर्षांत अमुलच्या दुधाचे दर प्रति लिटर दरवर्षी 4 टक्क्यांनी वाढले आहेत. वीज, पॅकेजिंग, दळणवळण आणि पशुखाद्य याचे वाढलेले दर यामुळे दुधाचे उत्पादन आणि इतर प्रक्रियेचा खर्च वाढला आहे.

हेही वाचा- Swabhimani Shetkari Sanghatana Agitation : स्वाभिमानीचा आक्रमक पवित्रा; वीज कार्यालय पेटवले, जिल्हाधिकारी कार्यालयात सोडला साप

कच्च्या मालाचे वाढलेले दर यामुळे सहकारी संस्थेच्या सदस्यांनी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या दुधाचे दर प्रति किलो फॅटला 35 रुपयांवरून 40 रुपये केले होते. ही दरवाढ गतवर्षी 5 टक्के होते. रुपयामधील 80 पैसे हे दुग्ध आणि दुग्धजन्य उत्पादकांना देण्यात असल्याचे अमुलने म्हटले आहे. दुधाचे दर वाढल्याने दुग्धोत्पादकांना अधिक उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन देणे शक्य होत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. जीसीएमएमएफने जुलै 2021 मध्ये दुधाचे दर प्रति लिटर 2 रुपयांनी वाढविले होते.

हेही वाचा-ED Summons Malik Son : नवाब मलिक यांच्या मुलाला ईडीकडून समन्स; आज होणार चौकशी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.