ETV Bharat / business

'अमूल'ला उलाढालीत २० टक्के वाढ होण्याची अपेक्षा, वार्षिक ४० हजार कोटींचा होणार व्यवसाय

अमूल फेडरशेनचे गुजरातमधील  १८ हजार ७०० गावांमध्ये ३६ लाखांहून अधिक सदस्य आहेत.  ते सदस्य   रोज २ कोटी ३० लाख लिटर दूध अमूल फेडरेशनला पुरवितात.

अमूल
author img

By

Published : May 13, 2019, 4:44 PM IST

नवी दिल्ली - जीसीएमएमएफ कंपनीचा ब्रँड असलेल्या अमूलला चालू वर्षात आर्थिक उलाढालीत २० टक्के वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे अमूलची एकूण वार्षिक उलाढाल ४० हजार कोटीवर पोहोचणार असल्याचे अमूलने म्हटले आहे.

गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनच्या आर्थिक उलाढालीत २०१८-१९ मध्ये १३ टक्के वाढ होवून एकूण व्यवसाय हा ३३ हजार १५० कोटींवर पोहोचला. त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात म्हणजे २०१७-२०१८ मध्ये आर्थिक उलाढाल ही २९ हजार २२५ कोटी रुपये होती.

गतवर्षी अमूलच्या उत्पादनांच्या किमती न वाढविता व्यवसायात वाढ झाली होती, असे अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस. सोधी यांनी सांगितले. मात्र, यंदा व्यवसाय व उत्पादनांच्या किमती अशा दोन्हीत वाढ होईल, असे त्यांनी सांगितले. अनेक राज्यात दुधाच्या किंमती घसरल्या असताना शेतकऱ्यांना अमूलकडून दुधाचा जास्त दर दिला जात असल्याची त्यांनी माहिती दिली. अमूलच्या दुधाची किंमती तात्काळ वाढणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अमूल फेडरशेनचे गुजरातमधील १८ हजार ७०० गावांमध्ये ३६ लाखांहून अधिक सदस्य आहेत. ते सदस्य रोज २ कोटी ३० लाख लिटर दूध अमूल फेडरेशनला पुरवितात. अमूलची दूध प्रक्रिया करण्याची क्षमता ही ३ कोटी ५० लाख लिटर प्रतिदिन एवढी आहे. ही क्षमता २ वर्षात वाढवून ३ कोटी ८० लाख लिटर प्रतिदिन करण्याचा अमूलचा प्रयत्न आहे.

Intro:Body:

biz

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.