ETV Bharat / business

आत्मनिर्भर भारत: टायर आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध - टायर आयात निर्बंध

जेएम फायनान्शियलच्या संशोधन अहवालानुसार देशात टायर आयातीचे प्रमाण खूप कमी होण्याची शक्यता आहे. कारण आयातदारांना परवाने घेण्यासाठी वेळ लागू शकतो.

Representative
प्रतिकात्मक
author img

By

Published : Jun 15, 2020, 4:54 PM IST

नवी दिल्ली – केंद्र सरकारने 'आत्मनिर्भर भारत' या घोषणेप्रमाणे देशीतील उद्योगांना चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विदेशातून आयात करण्यात येणाऱ्या न्यूमॅटिक म्हणजे हवेचा वापर होणाऱ्या टायरवर निर्बंध लागू केले आहेत.

न्यूमॅटिक टायरच्या आयातीवर निर्बंध लागू केल्याचे निर्देश विदेश व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) काढले आहेत. यामध्ये प्रवासी वाहने, बस, दुचाकीसाठी वापरणाऱ्या टायरचा समावेश आहे. देशात आयात होणाऱ्या टायरच्या एकूण आयातीत न्यूमॅटिक टायरचा 75 टक्के समावेश आहे. त्यामुळे आयातदार कंपन्यांना यापुढे अशा टायरची आयात करण्यासाठी डीजीएफटीचा परवाना लागणार आहे.

जेएम फायनान्शियलच्या संशोधन अहवालानुसार देशात टायर आयातीचे प्रमाण खूप कमी होण्याची शक्यता आहे. कारण आयातदारांना परवाने घेण्यासाठी वेळ लागू शकतो. भारतात 2019 मध्ये 27 अब्ज किमतीच्या टायरची आयात करण्यात आली होती. भारतीय टायर उद्योगाने चीनसह इतर देशांमधून आयात होणाऱ्या टायरवर निर्बंध लागू करण्याची यापूर्वीही मागणी केली होती.

दरम्यान, केंद्र सरकारने कोरोनाच्या संकटकाळात 'आत्मनिर्भर भारता'साठी विविध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये देशातील आयातीचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट आहेे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.