ETV Bharat / briefs

पंढरपूरजवळ 62 लाखांचा तंबाखूसाठा जप्त, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

author img

By

Published : Jul 2, 2020, 7:11 PM IST

राज्यामध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तंबाखूचा उपयोग फक्त शेतीतील औषधींसाठी करता येऊ शकतो. त्यामुळे व्यंकटेश अ‌ॅग्रो या कंपनीने 62 लाख रुपयांच्या तंबाखूची खरेदी बिले दाखवावी, अशी नोटीस अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे.

Tobacco seized Pandharpur
Tobacco seized Pandharpur

सोलापूर- पंढरपूरपासून जवळच असलेल्या विसावा येथील गोडाऊनवर छापा टाकून 62 लाखांची तंबाखू जप्त करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली असून तंबाखू खरेदी केलेली बिले जमा न केल्यास गोडाऊनच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांनी दिली आहे.

पंढरपूर शहरापासून जवळच असलेल्या विसावा याठिकाणी व्यंकटेश अ‌ॅग्रो या दुकानाचे गोडाऊन आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाला विसावा येथील गोडाऊनमध्ये तंबाखू साठा असल्याची गुप्त माहिती कळाली होती. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने संबंधित ठिकाणी धाड टाकली आणि गोडाऊनची तपासणी केली. अन्न व औषध प्रशासन विभागाला गोदामात 62 लाख 7 हजार रुपये किमतीची तंबाखूची साठवणूक केली असल्याचे निष्पन्न झाले.

राज्यामध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे. तंबाखूचा उपयोग फक्त शेतीतील औषधींसाठी करता येऊ शकतो. त्यामुळे व्यंकटेश अ‌ॅग्रो या कंपनीने 62 लाख रुपयांच्या तंबाखूची खरेदी बिले दाखवावी, अशी नोटीस अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे.

दरम्यान, 62 लाख रुपयांच्या तंबाखूची खरेदी केली असल्याची बिले व्यंकटेश अ‌ॅग्रो तर्फे दाखविण्यात आली नाही. सदर तंबाखू साठा हा लॉकडाऊन पूर्व काळात घेण्यात आला असून खरेदी केलेली बिले ही जीएसटीच्या कामासाठी कार्यालयात ठेवण्यात आली असल्याचे दुकानदाराकडून अन्न व औषध प्रशासन विभागाला सांगण्यात आले आहे. येत्या 7 दिवसांमध्ये संबंधित दुकानदाराने 62 लाख रुपयांची तंबाखू खरेदी केल्याची बिले न दाखविल्यास दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप रावत यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.