ETV Bharat / briefs

आफ्रिकेचा 'हा' खेळाडू दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात दाखल

author img

By

Published : Mar 28, 2019, 6:40 PM IST

मॉरिसचे हे आयपीएलमधील सहावे वर्ष आहे. या वर्षी लिलावात दिल्लीने मॉरिसला रिटेन केले.

दिल्ली कॅपिटल्स

नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस आयपीएलच्या १२ व्या सत्रासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात दाखल झाला आहे. मॉरिस सोमवारी सायंकाळीच संघात दाखल झाला असला तरी त्याला मंगळवारी चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. या सामन्यात चेन्नईने दिल्लीचा ६ गडी राखून पराभव केला.

मॉरिसचे हे आयपीएलमधील सहावे वर्ष आहे. या वर्षी लिलावात दिल्लीने मॉरिसला रिटेन केले. त्याने आयपीएलची सुरुवात चेन्नई सुपरकिंग्जच्या संघासोबत केली होती. त्यानंतर तो दिल्लीच्या संघासोबत खेळत आहे.

डेथ ओव्हरमध्ये अचूक यॉर्कर टाकण्यात प्रसिद्ध असलेल्या मॉरिसने आयपीएलच्या ५२ सामन्यात ४८५ धावा केल्या असूनत त्यात ५६ गडी बाद केले. मागील वर्षी तो केवळ ४ सामनेच खेळू शकला होता.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.