ETV Bharat / briefs

कल्याण डोंबिवलीत २४ तासात ७२ नवे कोरोनाबाधित रुग्ण, तर चौघांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली क्षेत्रातील तब्बल 673 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर रुग्णालयातून कोरोनातुन मुक्त होऊन घरी जाण्याऱ्या रुग्णांची संख्या 843 वर पोचवली आहे.

thane corona news
thane corona news
author img

By

Published : Jun 9, 2020, 10:21 PM IST

ठाणे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारी नव्याने 72 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. नव्याने आढळलेल्या रूग्णांपैकी चार रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंगळवारी एकाच दिवसात कोरोना बाधितांची संख्येत मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी कोरोनाचा प्रादुर्भाव डोंबिवली पश्चिमेस मोठा प्रमाणात वाढल्याचे दिसून आले.

कल्याण डोंबिवली क्षेत्रातील तब्बल 673 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर रुग्णालयातून कोरोनातुन मुक्त होऊन घरी जाण्याऱ्या रुग्णांची संख्या 843 वर पोचवली आहे. मंगळवारी कल्याण पश्चिमेतील टिळक चौक आणि सुभाष चौक परिसरातील दोन कोरोना रुग्ण आणि कल्याण पूर्वेतील होमी भाभा टेकडी पत्रिपुल आणि ठाकुर्ली पूर्व येथील प्रत्येकी एक एक रुग्णाचा मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा 46 पार झाला आहे. मंगळवारी कल्याण पूर्वेत 8 रुग्ण, कल्याण पश्चिम परिसर 19, डोंबिवली पूर्वेत 10 रुग्ण, तर डोंबिवली पश्चिमेत 33, रुग्ण आढळले आहे. तर आंबिवलीमध्ये एक रुग्ण, टिटवाळा मधील आरोग्य केंद्राजवळ मांडा पूर्व आणि गोवेली रोड, गणेशवाडी, परिसरातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, पावसाळ्यात कोरोनाचा आकडा वाढण्याची शक्यता जास्त असल्याने नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवून व्यवहार करावे. तसेच नागरिकांनी सरकारने आणि पालिका प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.