मुंबई - दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ मुंबई इंडियन्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकरसोबत डिनर करताना दिसून आला. त्याने डिनरनंतर सचिन तेंडुलकरसोबत काढलेला फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्याने लिहिले आहे की, डिनरसाठी सचिन सरांचे आभार. आपल्याला भेटून प्रत्येक वेळी आनंद होतो. सचिन सोबतचा पृथ्वीने काढलेला हा फोटो आयसीसीनेही त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.
पृथ्वी शॉने आयपीएलच्या या मौसमात १८७ धावा केल्या आहेत. यात केकेआर संघाविरुद्ध खेळताना ९९ धावांच्या खेळीचाही समावेश आहे. या खेळीनंतर इतर सामन्यात त्याला चमक दाखविता आली नाही. पृथ्वीला मुंबई इंडियन्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात चमकदार कामगिरी करून सचिन तेंडुलकरला प्रभावित करण्याची संधी आहे. आयपीएलमध्ये मुंबई आणि दिल्लीच्या संघाने प्रत्येकी ५ सामने जिंकले आहेत.