लाहोर - रावळपिंडी एक्सप्रेस नावाने प्रसिद्ध असलेला पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज शोएब अख्तरने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. अख्तरकडून शेअर केला गेलेला हा व्हिडिओ लोकांना खूप आवडत आहे. व्हिडिओला त्याने 'व्हॉट अ कॅच' असे कॅप्शन दिली आहे. आतापर्यंत १ लाख ३२ हजार लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
-
What a catch 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 pic.twitter.com/nvM3wPl8r3
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) April 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">What a catch 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 pic.twitter.com/nvM3wPl8r3
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) April 11, 2019What a catch 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 pic.twitter.com/nvM3wPl8r3
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) April 11, 2019
जवळजवळ ४ हजार लोकांनी याला रिट्विट केले आहे. या पोस्टला गंमतीशीर कमेंट्स येत आहेत. या व्हिडिओतून अख्तरला ट्रोलही करण्यात येत आहे. एका युजर्सने लिहिले, की पाकिस्तानने अशीच कॅच पकडली असती तर अजून एक विश्वचषक पाकिस्तान जिंकला असता.
या व्हिडिओत लहान मुले क्रिकेट खेळत आहेत. एक मुलगा फलंदाजी करत असतो. दुसरीकडून एक छोटा मुलगा धावत येतो आणि सरळ फलंदाजाच्या बॅट पाय ठेवून स्लिपमध्ये उभे राहिल्या मुलाच्या हातात पडतो आणि त्यानंतर अख्तरचा कॉमेट्रीमधून आवाज येतो की मिळाली विकेट याचीच गरज होती म्हणून चेंडू स्टम्प टू स्टम्प टाकायचा असतो.
काही दिवसांपूर्वी अख्तरने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांना विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असल्याचे सांगितले होते. विश्वचषकाच्या पंसतीत त्याने भारताला स्थान दिले नाही.