भोपाळ - बैतूल येथील एका युवकाने आपल्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेसोबत छोटेसे रोपटे देत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनोखा संदेश दिला आहे. यानिमित्ताने या युवकाने पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. या युवकाचे नाव महेश पुंडे असे असून तो वीज वितरण विभागात मिटर रिडींग घेण्याचे काम करतो.
या युवकाचा येणाऱ्या 15 जूनला चुन्नीढाना येथे राहणाऱ्या निकता सोबत विवाह होणार आहे. अशावेळी आपले आप्तेष्ठ आणि नातलगांना लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी महेशने अनोखी कल्पना केली आहे. महेशने छोटी छोटी रोपे तयार करून यावरच लग्नाची निमंत्रण पत्रिका तयार केली आहे. या निमंत्रण पत्रिकेवर त्याने ''ग्रीन इंडिया, कोरोना फ्री इंडिया'' असा संदेश देत लोकांना आपल्या लग्नाचे निमंत्रण दिले आहे.
कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन असल्यामुळे वर पक्षाकून फक्त 25 जणांना परवानगी देण्यात आली आहे. अशातच महेशने फक्त 25 निमंत्रण पत्रिका दिल्या आहेत. या निमंत्रण पत्रिकेत पाहुण्यांनी मास्क आणि सामाजिक अंतर राखण्ययाचे आवाहन केले आह्. या अनोख्या निमंत्रण पत्रिकेमुळे पर्यावरणाचे संवर्धन होईल आणि अनेकांना अशा निमंत्रण पत्रिका वापरण्याची प्रेरणा मिळेल. महेशने सांगितले की, लग्नामध्ये येणाऱ्या पाहुण्यांना मास्क आणि सॅनिटायझर देण्यात येणार असल्याचे सांगितले.