नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तानमध्ये ३ मे १९९९ ला कारगिल युद्ध सुरू झाले आणि २६ जुलै १९९९ मध्ये या युद्धात भारताने विजय मिळवला. भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर असणाऱ्या जम्मू-काश्मिरमधील कारगिल जिल्ह्यामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात मे, जून आणि जुलै असे तीन महिने युद्ध सुरू होते. कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेली घुसखोरी रोखण्यासाठी आणि त्यांनी काबीज केलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भारताने ऑपरेशन विजयची सुरुवात केली. भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील धोरण आणि राजकीय मुत्सद्देगिरीच्या जोरावर पाकिस्तानला कारगिलमधून सैन्य मागे घ्यावे लागले होते.
भारताकडून जागतीक पातळीवर पाकिस्तावर दबाव
- भारताला ज्यावेळी पाकिस्तानी घुसखोर सैनिक कारगिलमध्ये शिरल्याचे माहिती मिळाली, तेव्हापासून भारताच्या सुरक्षा विभागाने युद्धनिती आणि जागतीक पातळीवर दबाव तंत्र आखून पाकिस्तानला नेस्तनाबून करायचे ठरवले.
- तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ आणि लेफ्टनंट जनरल मोहम्मद अजीज खान यांच्यात टेलिफोनवर झालेल्या संभाषणामुळे पाकिस्तानचे कारगील बाबतचे पितळ उघडे पडले. यामुळे पाकिस्तानचा खोटेपणा जगासमोर आला. परिणामी आंरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची नाचक्की करण्यात भारत यशस्वी झाला.
- पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर हे सांगण्याचे प्रयत्न करत होता की, एलओसीवर (लाईन ऑफ कंट्रोल) परिस्थिती ठीक आहे. मात्र, सियाचीन भागातील परिस्थिती जागतीक पातळीवर मांडण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील होता.
- भारताकडून जागतीक पातळीवर ठाम भूमिका मांडण्यात आली. तसेच पाकिस्तानने कारगिलमध्ये केलेला हल्ला म्हणजे भारताच्या सार्वभौमत्त्वावरचा हल्ला आहे, ही बाब प्रभावीपणे मांडली.
- भारत आणि पाकिस्तान या दोन्ही अण्वस्त्र संपन्न देशांनी जबाबदारीने वागायला हवे. ही बाब पाकिस्तान विसरला आहे. त्यामुळेच त्यांनी कारगिलमध्ये घुसखोरी करून भारतावर हल्ला केला. अशी भूमिका भारताने मांडली.
- पाकिस्तानला आशा होती की, जगातील प्रमुख देश सोबत राहतील. मात्र, भारताच्या डावपेचांमुळे अमेरिकेने पाकिस्तावर दबाव टाकला. परिणामी पाकिस्तानला कारगिल युद्धामध्ये पराभव स्वीकारावा लागला आणि सैन्य मागे घ्यायला भारताने भाग पाडले.
- कारगिल युद्धादरम्यान भारताने एलओसी न ओलांडल्यामुळे भारताची जागतीक पातळीवर चांगली ओळख आणि वातावरण निर्मिती झाली. जनरल व्हीपी मलिक यांनी आपल्या 'इंडियाज मिलिट्री कॉन्फ्लिक्ट्स अॅंड डिप्लोमसी’ या पुस्तकामध्ये भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधाबाबत भाष्य केले आहे.
- पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. तसेच पाकने शिमला कराराचे उल्लंघनही केले. ही बाब भारताने जागतिक पातळीवर प्रभावीपणे मांडली.
- भारताकडे अणुबॉम्ब असूनही एक जबाबदार देश दुसऱ्या देशाने हल्ला केला तरी कसा वागू शकतो, ही बाब पटवून दिली.
- जून 1999 च्या शेवटी अमेरिका, युरोपीय संघ आणि जी-8 या देशांनी पाकिस्तानला सैन्य मागे घेण्यासाठी भाग पाडले अन्यथा पाकिस्तावर निर्बंध लावले जाण्याची धमकी दिली.
- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ 4 जुलै 1999 ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांना भेटण्यासाठी वॉशिंग्टनला पोहोचले. अर्थातच भारताच्या मुत्सद्देगिरीला यश मिळाले. अखेर पाकिस्तानला मागार घ्यावी लागली.
राजकीय मुत्सद्देगिरीचे प्रमुख शिलेदार -
- भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निरीक्षणामुळे भारताची रणनिती यशस्वी झाली.
- भारताचे सुरक्षा सल्लागार ब्रिजेश मिश्रा यांनी सांगितले आहे की, भारताने सामंजस्याने काम केल्यामुळे चांगले परिणाम पाहायला मिळाले.
- परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांनी जागतीक पातळीवरील रणनितीच्या नियोजनाचे नेतृत्व केले. तसेच सचिव के रघुनाथ यांनी ही जबाबदारी निभावली.