नांदेड - जिल्ह्यात कोरोना टेस्ट घटल्या असून त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णसंख्या कमी झाली आहे. आज प्राप्त झालेल्या 1 हजार 850 अहवालापैकी 337 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 248 तर अँटिजेन तपासणीद्वारे 89 अहवाल बाधित आहेत.
जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 84 हजार 961 एवढी झाली असून यातील 77 हजार 659 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 5 हजार 285 रुग्ण उपचार घेत असून 177 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.
तीन दिवसात 19 जणांचा मृत्यू -
7 ते 9 मे दरम्यान 19 रुग्णांचा मृत्यू झाला. याबरोबरच जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 715 एवढी झाली आहे.
उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या -
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 60, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 54, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 29 खाटा उपलब्ध आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व बाधितांची संक्षिप्त माहिती -
एकूण घेतलेले स्वॅब- 4 लाख 83 हजार 992
एकूण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 88 हजार 948
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 84 हजार 961
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 77 हजार 659
एकूण मृत्यू संख्या-1 हजार 715
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.40 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-7
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-10
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-375
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 5 हजार 285
अतिगंभीर प्रकृती असलेले-177