ETV Bharat / briefs

शरद पवारांसारख्या नेत्यांवर हलके विधान करु नये, मोदींच्या वक्तव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्धा येथे भारतीय जनता पक्षाची प्रचारसभा घेतली. यात त्यांनी शरद पवारांवर टीका केली. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसवरची पकड ढिली होत आहे. अजित पवार यांच्याकडून पक्ष हायजॅक केला जात आहे.

प्रफुल्ल पटेल
author img

By

Published : Apr 2, 2019, 11:29 AM IST

भंडारा - शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल दुसऱ्या एका मोठ्या नेत्याने हलके विधान करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली. ते भंडाऱ्यात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. शरद पवारांची पक्षावरील पकड ढिली पडत असल्याचे विधान नरेंद्र मोदींनी वर्धा येथे केले होते.

प्रफुल्ल पटेल यांनी भंडाऱ्यात बोलताना मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्धा येथे भारतीय जनता पक्षाची प्रचारसभा घेतली. यात त्यांनी शरद पवारांवर टीका केली. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसवरची पकड ढिली होत आहे. अजित पवार यांच्याकडून पक्ष हायजॅक केला जात आहे. पवारांना याची जाणीव आधीच झाली होती. म्हणूनच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली, असे मोदी म्हणाले होते.

यावर प्रतिक्रिया देतान पटेल म्हणाले, की शरद पवार हे गेल्या ५५ वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. आतापर्यंत ते १४ ते १५ निवडणुका लढले आहेत आणि जिंकले आहेत. त्यामुळे अशा मोठ्या नेत्याबद्दल दुसऱ्या एका मोठ्या नेत्याने इतके हलके विधान करणे योग्य नाही. दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून पवारांवरील या विधानाचा याआधीच समाचार घेण्यात आला होता.

Intro:ANC : शरद पवार यांच्यावर मोदींने जाहीर सभेत केलेल्या टिकेला उत्तर देत प्रफुल्ल पटेल यांनी म्हंटल की एका मोठ्या नेत्यांनी दुसऱ्या मोठ्या नेत्या बद्दल असे भाष्य करू नये.

Body:सोमवार 1 एप्रिल ला नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील जाहीर सभेत शरद पवार यांच्यावर टीका करीत शरद पवार यांची पक्षावरील पकड ढिली झाली असुन त्यांना भविष्याची पहिलेच जाणीव होत असल्याने शरद पवार यांनी निवडणुकीत माघार घेतली आहे.
या टिकेकर उत्तर देतांना राष्ट्रवादी च्या प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले की शरद पवार हे मागील 55 वर्ष्यापासून समाजकारणात आहेत आता पर्यंत 14 ते 15 सार्वजनिक निवडणूक जिंकले आहेत त्यामुळे अश्या मोठ्या नेत्यांवर मोदी सारख्या मोठ्या नेत्याने अश्या पद्धतीचे भाष्य करणे योग्य नाही असे मत त्यांनी प्रसार माध्यमांसमोर सांगितले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.