ETV Bharat / briefs

सनी देओल करतोय प्रचार, तर धर्मेंद्र यांच्या मनी शेतीचाच विचार

author img

By

Published : May 16, 2019, 11:56 PM IST

सनी देओल लोकसभा निवडणूकीच्या प्रचारात गुंतलाय. धर्मेंद्र यांनी त्याचा प्रचार केला, मात्र त्यांचे मन शेतातच रमते. त्यांनी अलिकडे एक व्हिडिओ शेअर करुन आपले प्रेम व्यक्त केले आहे.

अभिनेता धर्मेंद्र

सनी देओल आपल्या लोकसभा प्रचारात मश्गुल आहे. त्याचे वडिल धर्मेंद्र यांनीही त्याचा प्रचार केला. धर्मेंद्र सोशल मीडियावर नेहमी काही व्हिडिओ शेअर करीत असतात. हा व्हिडिओ निवडणुकीचा नाही तर त्यांच्या धरतीवरील प्रेमाचा असतो. आताही त्यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल झालाय.

धर्मेंद्र यांनी आत्ताही एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. यात त्यांचे पठाणकोट येथील शेतजमीन दिसत आहे. गव्हाची कापणी झालेले शेत ते दाखवताना दिसतात. या धरणी मातेवर आपले प्रेम असल्याचे ते सांगतात. ही भूमी आपल्यासाठी काय काय करते याचे ते गुणगान व्हडिओत करताना दिसतात. हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाल आहे.

धर्मेंद्र पुत्र सनी देओल गुरुदासपूरमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवीत आहे. त्याचा मुकाबला काँग्रेसच्या सुनिल जाखड यांच्याशी आहे. यापूर्वी या जागेवरुन विनोद खन्ना भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यांच्या निधनानंतर या जागेवर सुनिल जाखड निवडून आले आहेत.

पंजाबमध्ये १९ मे'ला निवडणूकीचे मतदान पार पडणार आहे. मुलाचा प्रचार केल्यानंतर धर्मेंद्र स्वतःकडे लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत असतात. धर्मेंद्र सध्या त्यांचा अधिक वेळ शेतात घालवत असतात. ते कधी शेतात काम करताना दिसतात तर कधी पळे तोडतानाचे फोटो शेअर करीत असतात. त्यांचे हे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांच्या माध्यमातून व्हायरल होत असतात.

Intro:Body:

ent news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.