ETV Bharat / state

जरांगे पाटील यांचं पुन्हा उपोषण; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही तरी तोडगा काढतील, अतुल सावे यांचा विश्वास - Jarange Patil Hunger Strike

Jarange Patil Hunger Strike : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण (Hunger Strike) सुरू केलय. तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं, अशी त्यांची आग्रही मागणी आहे. याप्रकरणी पालकमंत्री अतुल सावे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Atul Save and Manoj Jarange Patil
अतुल सावे आणि मनोज जरांगे पाटील (संग्रहित छायाचित्र)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2024, 4:21 PM IST

जालना Jarange Patil Hunger Strike : मनोज जरांगे हे सगे सोयरे शब्दाची अमंलबजावणी व्हावी, सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करावं यासाठी उपोषण करत आहेत. हैदराबाद सातारा आणि बाॅम्बे गॅजेट लागू करण्यात यावं. तसंच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशा विविध मागण्यांसाठी त्यांनी अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषण (Hunger Strike) सुरू केलंय. यावर मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेवून तोडगा काढतील असा विश्वास अतुल सावे यांनी व्यक्त केलाय.

मुख्यमंत्री तोडगा काढतील : मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) काही तरी तोडगा काढतील असा विश्वास, जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी व्यक्त केलाय. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

प्रतिक्रिया देताना अतुल सावे आणि मनोज जरांगे पाटील (ETV BHARAT Reporter)

मुख्यमंत्र्यांसह फडणवीसांना दिला इशारा : आरक्षण न मिळणं हा अन्याय आहे. त्यामुळंच आम्ही न्यायासाठी उपोषण सुरू केलय. आम्हाला आरक्षण असूनही दिलं जात नाही. त्यामुळं अखंड महाराष्ट्रात येऊन आम्ही चूक केली का? असा सवाल जरांगे यांनी केलाय. जरांगे अंतरवाली सराटीत सोमवारी रात्रीपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. आमच्या मागण्यांबाबत कुणी बोलो अथवा न बोलो, आम्ही लढा सुरुच ठेवणार. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास जनतेपुढे तुम्ही जबाबदार असा इशाराही जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांसह फडणवीस यांना दिला.

फडणवीस यांना ही शेवटची संधी : प्रत्येकवेळी आमची चेष्टा करणार असाल तर तुम्हाला त्याची किंमत चुकवावी लागेल, असंही जरांगे फडणवीसांना उद्देशून म्हणाले. सत्ताधाऱ्यांना फक्त खुर्ची दिसते, फडणवीस यांना ही शेवटची संधी आहे. आरक्षण न दिल्यास माझ्या वाटेला जाऊ नका मी गुडघ्यावरच टेकवीन. अधिवेशन कशासाठी घेताय हा विषय लोकांना सांगा. दोन दिवस अधिवेशन घ्या आता पळपुटेपणा करु नका, खिचडी करु नका, आरक्षणासाठी स्वतंत्र दिवस ठरवा अशी मागणी, जरांगे यांनी केली.

हेही वाचा -

  1. "...हा राऊत नाही तर फडणवीसांचा डाव", नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? - Manoj Jarange On Rajendra Raut
  2. "मराठ्यांच्या छाव्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नका", आमदार राजेंद्र राऊतांचं मनोज जरांगेंना आव्हान - Rajendra Raut On Manoj Jarange
  3. देवेंद्र फडणवीसांशिवाय सरकारचं पान हलत नाही - मनोज जरांगे पाटील - Manoj Jarange Patil

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.