जर्मनीत गणेशोत्सवाचा जल्लोष: सातारा, पुण्यातील ढोलताशा अन् महिलांची लेझीम जुगलबंदी ठरली लक्षवेधी, पाहा व्हिडिओ - Germany Ganeshotsav 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 17, 2024, 3:26 PM IST
|Updated : Sep 17, 2024, 3:37 PM IST
सातारा Germany Ganeshotsav 2024 : मराठी विश्व फ्रांकेन (MVP) आणि इंडियन कम्युनिटी फ्रांकेन (ICF) यांच्या संयुक्त विद्यमानं जर्मनीतील एर्लांगन शहरात गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. पुण्यातील रमणबाग युवा ढोलताशा पथक, ओम ढोलताशा पथकाच्या ढोल वादनानं आणि महिलांच्या लेझीम जुगलबंदीनं जर्मनीकरांचं लक्ष वेधलं. एर्लांगन शहरातील सरकारी कार्यालयासमोरील पटांगणावर ढोल वादन आणि लेझीम जुगलबंदीचा कार्यक्रम पार पडला. पारंपरिक पद्धतीनं गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच महाआरती करून ढोलताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. लहान मुलांसाठी गणेशमूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं. या उत्सवातील उपक्रमांसाठी विवेक बोंबटकर, अवनीश कांबळे, रश्मी गावंडे, रसिका कुलकर्णी, आशा रमेश आणि रमेश रमानुजम यांनी योगदान दिलं. गणेशोत्सवात दोन हजार जर्मन आणि जर्मनस्थित भारतीयांनी हजेरी लावली. मराठी विश्व फ्रांकेंनच्या संस्थापक रश्मी गावंडे (अकोला), अमोल कांबळे (कराड), तृप्ती सपकाळ (नागपूर) यांनी उत्सवासाठी पुढाकार घेतला.