पुणे Pune Ganpati Visarjan 2024 : गणपती बाप्पा मोरया..मंगलमूर्ती मोरया..पुढच्या वर्षी लवकर या...असं म्हणत ढोल-ताशांच्या गजरात, सनई-चौघड्याच्या निनादात आणि उत्साहात आनंदात पुण्याच्या वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीला वाजता वाजत गाजत सुरूवात झालीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि मानाचा पहिला श्री कसबा गणपती बाप्पाची आरती करून मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली.
चांदीच्या पालखीतून मिरवणुक : मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळाची श्रींची मिरवणूक चांदीच्या पालखीतून निघालीय. मिरवणुकीमध्ये गायकवाड बंधूचे सनई वादन आणि देवलकर बंधू चे चौघडावादन, नगारखाना, प्रभात बँड, कामायनी प्रशाला, बँक ऑफ इंडियाचं पथकं आहे. रमणबाग प्रशाला, रुद्रगर्जना ढोल-ताशा पथक आणि परशुराम ढोल-ताशा पथके वादन करत आहे.
तांबडी जोगेश्वरी गणपतीची जल्लोषात मिरवणुक : गुलाल आणि फुलांची उधळण करत श्री तांबडी जोगेश्वरीच्या विसर्जन मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात झाली. पारंपरिक पोशाखात कार्यकर्ते सहभागी झालेत. सतीश आढाव यांचं नगारा वादन, न्यू गंधर्व ब्रास बँन्ड, समर्थ प्रतिष्ठान, ताल, शिवमुद्रा ढोल-ताशा पथकं मिरवणुकीत सहभागी झालंय. तर विष्णूनादचे कार्यकर्ते पालखी पुढे शंख नाद करत आहे.
तृतीय पंथीयांच्या ढोल-ताशा पथकाचा सहभाग : मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळात स्वप्निल व सुभाष सरपाले यांनी बनविलेल्या आकर्षक फुलांच्या सूर्यरथात रथात श्रींची मूर्ती विराजमान झाली. या मिरवणुकीत नादब्रह्म,नादब्रह्म ट्रस्ट, गर्जना ढोलताशा पथकं वादन करत आहे. यंदा विशेष बाब म्हणजे राज्यात प्रथमच सुरू झालेलं तृतीय पंथीयांचं शिखंडी पथक वादन करत असून गणेश भक्तांकडून या पथकाला विशेष दाद मिळत आहे.
मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडळाची श्रींची मिरवणूक जगन्नाथ पूरी रथातून निघाली आहे.मिरवणुकीत लोणकर बंधूंचा नगारा, स्व-रूपवर्धिनी, गजलक्ष्मी, ही ढोल-ताशा पथकं सहभागी झाली असून त्यांच्याकडून वादन सुरू आहे. मंडळातील कार्यकर्ते स्वतः श्रींचा रथ ओढत आहे.
माऊली रथ : मानाचा पाचवा केसरीवाड्याचा गणपतीची रथातून मिरवणूक निघालीय. मिरवणुकीत बिडवे बंधूंच्या नगारा, शिवमुद्रा, श्रीराम आणि आवर्तन ढोल-ताशा पथकं वादन करत आहे. विठ्ठलाची भव्य मूर्ती असलेला माऊली रथ मिरवणुकीचं आकर्षण आहे. विशेष म्हणजे यंदा इतिहास अभ्यासक मोहन शेटे हे लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेत असून त्यांच्या वेशभूषेकडे गणेशभक्त आकर्षित झाले आहेत.
हेही वाचा
- लाडक्या गणरायाला आज निरोप... मुंबईत 24,000 हून अधिक पोलीस तैनात - Ganesh visarjan 2024
- पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला 'अशी' होणार सुरवात, मानाच्या गणपती मंडळात 'ही' पथके होणार सहभागी - Pune Ganesh Visarjan
- लालबागमधून विसर्जनासाठी सर्वप्रथम निघणार मुंबईचा राजा, त्यानंतर 'अशी' निघणार बाप्पांची मिरवणूक - Anant chaturdashi 2024