ETV Bharat / entertainment

कंगना रणौतनं सेन्सॉर बोर्डाला म्हटलं 'यूजलेस', केली ओटीटीवर सेन्सॉरशिपची मागणी - EMERGENCY

Kangana Ranaut : कंगना रणौतनं 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे सेन्सॉर बोर्डावर निशाणा साधला आहे. तिनं चित्रपटाला प्रमाणपत्र आणि ओटीटीवर सेन्सॉरशिपची मागणी केली आहे.

Kangana Ranaut
कंगना रणौत (कंगना रणौत (ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2024, 4:00 PM IST

मुंबई - Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणौत सध्या तिच्या वादग्रस्त चित्रपट 'इमर्जन्सी'मुळे चर्चेत आहे. 'इमर्जन्सी' हा चित्रपट 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र शीख समुदायाच्या विरोधामुळे 'इमर्जन्सी' अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. सेन्सॉर बोर्डानं कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी'ला हिरवा झेंडा दाखवला नाही. आता तिनं पुन्हा एकदा एका मुलाखतीत याबद्दलचं विधान केलं आहे. नुकतीच एका मुलाखतीत कंगनानं ओटीटीवर येणाऱ्या काही कंटेंटवर प्रश्न उपस्थित केले असून सेन्सॉरशिपची मागणी केली आहे. तिनं सेन्सॉर बोर्डाला 'यूजलेस' असल्याचं म्हटलं आहे.

कंगना राणौतनं साधला सेन्सॉर बोर्डावर निशाणा : ओटीटी कंटेंटही सेन्सॉर बोर्डाच्या कक्षेत यायला हवे, अशी देखील तिनं मागणी केली आहे. कंगनानं म्हटलं की, 'आजकाल मुले यूट्यूबचा खूप वापर करत आहेत, जे खूपच चिंताजनक आहे. ओटीटीवर येणारा कंटेंट मुलांसाठी धोकादायक आहे. ओटीटीसाठी लोक पैसे देतात आणि काहीही पाहातात, हे चुकीचं आहे.' ओटीटी कंटेंटला सेन्सॉर बोर्डाची सर्वाधिक गरज असल्याचं कंगनानं म्हटलं आहे. कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटात शीख समुदायाला दहशतवादी दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. 14 ऑगस्ट रोजी 'इमर्जन्सी'चा ट्रेलर रिलीज झाला होता. यामध्ये इंदिरा गांधींच्या हत्येचं दृश्य पाहून शीख समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या.

'इमर्जन्सी' चित्रपटाची स्टारकास्ट : यानंतर या चित्रपटाचा विरोध करण्यात करण्यात आला. 'इमर्जन्सी' हा चित्रपट भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी 1975 साली लादलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये कंगाना व्यतिरिक्त विशाक नायर, मिलिंद सोमण, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे, सतीश कौशिक, अनुपम खेर, भूमिका चावला आणि अधीर भट यांच्या विशेष भूमिका आहेत. हा चित्रपट 25 कोटीच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. कंगना राणौतचा हा चित्रपट कधी रिलीज होणार याची वाट तिचे चाहते पाहताना दिसत आहेत.

हेही वाचा :

  1. कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी'वर टांगती तलवार, रिलीज डेट पुढे ढकलल्यामुळे नाराज - emergency Movie
  2. कंगना रणौतनं पुन्हा एकदा रणबीर कपूरवर साधला निशाणा, काय म्हटलं जाणून घ्या... - Kangana Ranaut
  3. कंगना रणौत स्टारर 'इमर्जन्सी' चित्रपटावर बंदीची मागणी, शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीनं पाठवली नोटीस - Emergency Trailer

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.