जयपूर - ऑस्ट्रेलियाचा प्रतिभाशाली खेळाडू अॅश्टन टर्नर यंदाच्या आयपीलमध्ये राजस्थान संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे. नुकतेच त्याच्या नावावर एका लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. टर्नर टी-२० मध्ये सलग ५ वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम केला आहे.
टर्नर शून्यावर बाद होण्याची सुरुवात फेब्रुवारीमध्ये बिग बॅश लीगमध्ये सुरुवात झाली. तिथे तो पहिल्यांदा शून्यावर बाद झाला त्यानंतर भारताविरुद्धच्या टी-२० सामन्यातही त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्याला कृणाल पंड्याने बाद केले. २६ वर्षीय फलंदाजा यंदा आयपीएलमध्ये सलग ३ सामन्यात शून्यावर बाद झाला. किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स आणि काल दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या संघाविरुद्ध तो शून्यावर बाद झाला आहे.
टर्नर हा पहिला फलंदाज आहे जो टी-२० क्रिकेटमध्ये सलग ५ वेळा शून्यावर माघारी परतला आहे. त्याचबरोबर सी. गणपती, एस. शिलिंगफोर्ड, टिम साउथी आणि मॅथ्यू होगार्ड हा ४ वेळा शून्यावर बाद झाला आहे.
टर्नर शिवाय आयपीएलमध्ये ३ वेळा बाद होण्याचा पराक्रम केकेआरचा माजी कर्णधार गौतम गंभीर आणि शार्दुल ठाकूर यांच्या नावावर आहे. गंभीर २०१४ तर २०१७ साली शार्दुल ठाकूर बाद झाला होता.