ETV Bharat / briefs

अकोल्यात 36 जण कोरोना पॉझिटिव्ह, तर एका रुग्णाचा मृत्यू - Corona patients number akola

कोरोना तपासणी अहवालात 36 जण पॉझिटिव्ह आले आहेत. यात काल रात्री अँटिजेन टेस्ट केलेल्या 8 रुग्णांचा देखील समावेश आहे.

Government hospital akola
Government hospital akola
author img

By

Published : Jul 29, 2020, 8:56 PM IST

अकोला- कोरोना तपासणी अहवालात 36 जण पॉझिटिव्ह आले आहेत. यात काल रात्री अँटिजेन टेस्ट केलेल्या 8 रुग्णांचा देखील समावेश आहे. तसेच, एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 23 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

36 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 10 महिला व 18 पुरुषांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये अकोट येथील 15 जण तर उर्वरित दगडीपूल, बांबुळगाव, पांढरी व राणेगाव तेल्हारा येथील प्रत्येकी एक, तसेच आलेगाव पातूर येथील 2 जण, बोंदरखेड, गोलाबाजार, हिंगणा रोड, जीएमसी, रौनक मंगल कार्यालय, मूर्तिजापूर व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच, या 36 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये काल रात्री अँटिजेन टेस्ट केलेल्या 8 रुग्णांचा देखील समावेश आहे.

दरम्यान, कोरोनामुळे एका 60 वर्षीय महिलेचा (रा. हिवरखेड, तेल्हारा) मृत्यू झाला आहे. महिलेला 15 जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच, आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 4, कोविड केअर सेंटर अकोला येथील 14, ओझोन रुग्णालय व हॉटेल रिजेन्सी येथून प्रत्येकी 2, तर आयकॉन रुग्णालय येथील 1, अशा एकूण 23 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज प्राप्त अहवालानुसार

प्राप्त अहवाल- २५४

पॉझिटिव्ह- २८

निगेटिव्ह- २२६

सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह अहवाल- २५२४

मृत-१०४

डिस्चार्ज- २०५४

दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)- ३६६

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.