पालघर - वसई-विरारमध्ये कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. आत्तापर्यंत येथील कोरोना रुग्णांचा आकडा 2 हजार 209 वर गेला आहे. महानगरपालिका हद्दीत आज दिवसभरात कोरोनाचे 138 नवे रूग्ण आढळले तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
नव्याने सापडलेल्या रुग्णांमुळे वसई-विरारमधील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 209 झाली आहे. काहीशी दिलासादायक बाब म्हणजे, आज दिवसभरात 88 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आज उपचारादरम्यान 3 रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे एकूण मृतांची संख्या 89 झाली आहे. आत्तापर्यंत 1 हजार 278 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 842 कोरोनाबाधित रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.