ETV Bharat / breaking-news

स्विंगचा किंग होणार गोलंदाजी प्रशिक्षक . . .

प्रवीण कुमार
author img

By

Published : Feb 2, 2019, 10:25 AM IST

2019-02-02 10:16:49

स्विंगचा किंग प्रवीणकुमारने व्यक्त केली गोलंदाजी प्रशिक्षक होण्याची इच्छा

Pravin Kumar
प्रवीणकुमार

मुंबई - गोलंदाजी प्रशिक्षक होण्याची संधी दिली तर मला नक्कीच आवडेल. पण त्यासाठी कुठलाच प्रस्ताव आला नाही. भविष्यात मला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करायला आवडेल, अशी इच्छा  स्विंगचा किंग आणि भारतीय क्रिकेट संघातून निवृत्त झालेल्या प्रवीण कुमारने व्यक्त केली आहे. 

भारतीय संघाचे कौतुक करताना प्रवीण कुमार म्हणाला की, क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात वेगवेगळ्या प्रकारचे गोलंदाज आपल्याकडे आहेत. ऑस्ट्रेलियातील विजयात गोलंदाजांचे मोठे योगदान आहे. वेगवेगळ्या शैलीचे गोलंदाज आपल्याकडे असल्याचा फायदा होत आहे. भारतीय गोलंदाज डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करतात. आयपीएल खेळाडूंसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म आहे. आयपीएलने गोलंदाजांना खूप काही शिकविले आहे. त्यामुळेच आपली गोलंदाजी मजबूत झाल्याचे प्रवीणने सांगितले.

भुवनेश्वर कुमारच्या बाबतीत बोलताना प्रवीण म्हणाला की, २००८ मध्ये तो आला होता तेव्हा ते १२०-१२२ च्या स्पीडने गोलंदाजी करत होता. सगळ्या ट्रेनिंग तो करत गेला. स्वत:ला फिट ठेवले. त्यामुळे त्याच्यात फरक पडल्याचे सांगितले. 

८-१० वर्षापूर्वीच्या ऑस्ट्रेलिया संघात पाँटिंग, हेडन, गिलख्रिस्टसारख्या आक्रमक खेळाडूंमुळे संघ मजबूत होता. आताचा संघ चांगला नाही. ऑस्ट्रेलियाच्या संघात अनुभवी खेळाडूंची कमतरता भासली. भारताला त्याचा फायदा घेत विजय मिळविला. स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वार्नर यांची कमतरता संघाला नक्कीच जाणवली असे प्रवीणने सांगितले. 

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.