उदयपूर (राजस्थान): जिल्ह्यातील गोगुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी एका तरुण आणि महिलेचा मृतदेह जंगलात विवस्त्र अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. यादरम्यान पोलिसांनी एफएसएल टीमला घटनास्थळी पाचारण केले आहे. सध्या दोन्ही मृतदेह पाहून खुनाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मृतदेह गोगुंडा परिसरातील उबेश्वरजी महादेवच्या जंगलात नग्न अवस्थेत आढळले. तरुणाचे गुप्तांगही कापलेले आढळून आले आहे. सध्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. एफएसएल टीम आणि श्वान पथकासह गोगुंडा आणि नई पोलिस ठाण्याचे पथकही घटनास्थळी हजर आहेत.
या संपूर्ण प्रकरणाबाबत उदयपूरचे एसपी विकास शर्मा म्हणाले की, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. सध्या मृतांची ओळख पटलेली नाही. मृतदेह पाहता तो एक-दोन दिवस जुना असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.