न्यूयॉर्क: टाइम मॅगेझिनने २०२२ च्या जगातील 'सर्वोत्तम ठिकाणांच्या' यादीत भारतातील अहमदाबाद आणि केरळचा समावेश केला आहे (Times list of worlds best places). या दोन्हींची 'भेट देण्यासाठी 50 विलक्षण ठिकाणे' म्हणून निवड करण्यात आली आहे. पर्यटन उद्योग पुन्हा रुळावर येत असल्याचे 'टाइम'ने मंगळवारी सांगितले. नियतकालिकाने म्हटले आहे की अहमदाबाद, भारताचे पहिले युनेस्को जागतिक वारसा शहर, येथे प्राचीन आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या नवकल्पना आहेत, ज्यामुळे ते सांस्कृतिक पर्यटनाचे केंद्र बनले आहे (world greatest places of 2022).
अहमदाबादचा गौरव - टाइमनुसार, साबरमती नदीच्या काठावर 36 एकरांवर वसलेल्या शांततामय गांधी आश्रमासह अहमदाबाद शहरात नवरात्रीचा आनंद घेता येतो. जगातील सर्वात दीर्घकाळ चालणारा नृत्य महोत्सव या शहरात नऊ दिवस साजरा केला जातो. टाइमच्या यादीत केरळचाही समावेश आहे. हे देशातील सर्वात सुंदर राज्यांपैकी एक आहे. नियतकालिकानुसार, भव्य समुद्रकिनारे आणि हिरवेगार 'बॅकवॉटर', मंदिरे आणि राजवाडे या सर्व कारणांसाठी याला 'देवाचा स्वतःचा देश' अर्थात देवभूमी म्हटले जाते.
जगातील इतरही शहरे यादीमध्ये - सर्वोत्तम ठिकाणांच्या यादीमध्ये रस अल खैमाह - संयुक्त अरब अमिराती, उटाह - सोल, ग्रेट बॅरियर रीफ - ऑस्ट्रेलिया, आर्क्टिक - स्पेन, ट्रान्स भूतान ट्रेल - भूतान, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक - बोगोटा यांचा समावेश आहे.